धुळे दर्पण न्यूज :-  महावितरणच्या वतीने यावर्षी १ जून ते ६ जून या कालावधीत 'विद्युत सुरक्षा सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. “शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र” या महत्वाकांक्षी संकल्पनेवर आधारित हा सप्ताह विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती घडवून आणण्यासाठी समर्पित आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये मॅरेथॉन, रॅली, निबंध लेखन, चित्रकला, प्रश्नमंजुषा अशा उपक्रमांचा समावेश आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

महावितरणने मागील काही वर्षांमध्ये वीज अपघातांचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश मिळवले आहे. मात्र, अपघात पूर्णपणे थांबलेले नसल्यामुळे विद्युत सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे अधोरेखित करत महावितरणने हे सप्ताह आयोजन केले आहे. “आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार” हे ब्रीद घेऊन हे अभियान राबवले जात आहे.

- Advertisement -

विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जून रोजी शहरातील परिमंडळ कार्यालयाच्या मुख्यालयाजवळ “रन फॉर सेफ्टी” ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नागरिक, विद्यार्थी, ग्राहक व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले. यानंतर संपूर्ण सप्ताहात विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

३ व ४ जून रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी, महावितरण कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

५ जून रोजी ‘वसुंधरा दिना’चे औचित्य साधत विद्युत सुरक्षा आणि वीज बचतीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात येणार आहे. बाजार परिसर, रहिवासी भाग व सार्वजनिक ठिकाणी ई-मेल, पोस्टर आणि इतर माध्यमातून नागरिकांना विद्युत सुरक्षेबाबत माहिती दिली जाणार आहे.

- Advertisement -

६ जून रोजी सकाळी १० ते १०.१५ या वेळेत संपूर्ण राज्यभरात विद्युत सुरक्षा प्रतिज्ञा घेतली जाईल. हा कार्यक्रम महावितरणच्या सर्व कार्यालयांमध्ये एकाच वेळी पार पडणार आहे.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, विद्यार्थी आणि जनतेचा यात मोठा सहभाग असून, या सप्ताहाच्या निमित्ताने सर्वांच्या सहकार्याने 'शून्य विद्युत अपघात' हे महावितरणचे ध्येय गाठण्याचा निर्धार करण्यात येत आहे.


( मुख्य संपादक:- सैय्यद सानिल , धुळे दर्पण)

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम