बकरी ईद पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील प्रशासन सतर्क; जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक
धुळे दर्पण न्यूज :- दिनांक ३ जून २०२५ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाधिकारी मा. भाग्यश्री विसपुते मॅडम यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी मॅडम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
बैठकीत सर्व संबंधित विभागांना सखोल सूचना देण्यात आल्या असून, कोणत्याही परिस्थितीत गोहत्येसारख्या बेकायदेशीर कृतीस स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे:
- गोहत्येची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे आणि अशा ठिकाणी गस्त वाढवणे.
- ज्या ठिकाणी गोमांस प्रक्रिया केली जाते आणि घाण नाल्यांमध्ये सोडली जाते, अशा ठिकाणी तातडीने बॅरिकेड्स लावण्याचे आदेश.
- बेकायदेशीर मासविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.
- मुख्य रस्त्यांवरील मांस विक्रेत्यांना हटवून त्यांना अधिकृत मासविक्री केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याचे आदेश.
- १७ पोलीस ठाण्यांतील शांतता समित्यांमध्ये आवश्यकतेनुसार फेरबदल करण्याचे निर्देश.
- कॉटन मार्केटमधील जनावरांची विक्री नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. टॅग पडताळणी करणारे अधिकारी नेमण्यात येणार.
- बाहेरगावाहून येणाऱ्या जनावरांना ओळख टॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
- एक विशेष कर्मचारी केवळ या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात येईल.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
अतिक्रमणविरोधी कार्यवाहीसंदर्भात चर्चा
या बैठकीत धुळे शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावरही सखोल चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण विरोधी कारवाई अधिक गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी, मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये होणारे अतिक्रमण हटवण्यावर भर देण्यात येणार आहे.
![]() |
| - Advertisement - |
या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. गजेंद्रशेठ अंपळकर, धुळे शहर विधानसभा आमदार मा. अनुप अग्रवाल, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, नगरपालिका कर्मचारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धुळे शहरात आगामी बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



