पहिली घटना धुळे तालुक्यातील अंचाडे शिवारात घडली. भरधाव वेगात असलेली मोटारसायकल अनियंत्रित होऊन रस्त्यावर घसरली. या अपघातात मागे बसलेली संगीता छोटू भील (वय ४२) ही महिला गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेले छोटू नरसिंग भील हे देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() |
| - Advertisement - |
दुसरा अपघात धुळे तालुक्यातील मुकटी शिवारात झाला. एमएच १८ बीवाय २०९४ या क्रमांकाच्या भरधाव मोटारसायकलने एमएच १८ एएस ११०५ या दुसऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात कल्पना अनिल गायकवाड (वय ४८, रा. चिंचखेडा, ता. धुळे) या महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर धडक देणारा मोटारसायकलस्वार घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी देखील धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरा अपघात साक्री तालुक्यातील नवडणे फाट्याजवळ घडला. भरधाव वेगात असलेल्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कमलेश भाईदास सोनवणे (वय १८, रा. नवडणे) या युवकाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले राहुल शिवदास सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी कमलेशच्या नातेवाईक सुकलाल गुलाब सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून साक्री पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या तिन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाढत्या वाहनांच्या वेगामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले असल्याने वाहतूक नियंत्रण आणि कडक कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.
– धुळे दर्पण –


