धुळे दर्पण न्यूज :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या, २६ जून रोजी संपूर्ण राज्यभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर समाजकल्याण विभागाच्या वतीने समता दिंडी आणि समता रथाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सामाजिक समतेचा संदेश देणारी समता दिंडी उद्या सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होणार आहे. ही प्रभातफेरी शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडणार असून विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.
![]() |
| - Advertisement - |
दिंडीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल: जिल्हाधिकारी कार्यालय → प्रशासकीय संकुल → जिजामाता हायस्कूल → झाशी राणी पुतळा → जुनी महानगरपालिका → महाराणा प्रताप पुतळा → फुलवाला चौक → महात्मा गांधी पुतळा → नगरपट्टी (पाटबाजार) → गल्ली नं. ४ → खोलगल्ली → सीमा हँडलुम → पारोळा रोड → कराचीवाला खुंट → जुनी महानगरपालिका → नवीन महानगरपालिका → कमलाबाई हायस्कूल चौक → जुने सिव्हिल हॉस्पिटल → संतोषी माता मंदिराजवळील गुलमोहर विश्रामगृह येथे समारोप करण्यात येणार आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या समता दिंडीत समाजातील सर्व घटकांनी, विशेषतः युवकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
____________________________________________


