![]() |
| पोस्टरला जोड्यांचा मार कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचा निषेध; तातडीने कायदेशीर कारवाईची मागणी |
धुळे दर्पण न्यूज :- पंढरपूर आषाढी वारीसारख्या हजारो वर्षांच्या धार्मिक परंपरेविषयी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील कान्हदेश वारकरी सेवा मंडळाने आज आझमी यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत त्यांच्या पोस्टरला चपलांनी मार देत निषेध केला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या या निषेध आंदोलनात "वारी आमची श्रद्धा आहे, तिचा अवमान खपवून घेतला जाणार नाही" अशा घोषणा देत आ. आजमी यांच्या वक्तव्यावर वारकरी मंडळींनी रोष व्यक्त केला. त्यांच्यावर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
वारकरी संप्रदायाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "वारी ही भक्ती, प्रेम, समतेचा संदेश देणारी परंपरा आहे. लाखो भाविक दरवर्षी पायी वारी करतात. अशा पवित्र सोहळ्याविषयी आक्षेपार्ह विधान करून आ. अबू आजमी यांनी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे."
यावेळी निवेदन सादर करताना कान्हदेश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष हभप सुधाकर भोकरे, हभप हिरामण गवळी, हभप सुनिल वाघ, धनराज देसले, विश्वासराव पाटील, कैलास पवार, योगिराज सैंदाणे, प्रकाश विभांडीक, शरद पाटील, उमेश नेरकर, किरण पाटील, श्यामकांत पाटील, डॉ. शांतीलाल देसले, संभाजी पाटील, पंडीत भिल, नारायण पाटील, कांतीलाल सोनार, विलास नांद्रे, रविंद्र मराठे, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.


