धुळे दर्पण न्यूज :- राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा टप्पा गाठण्यात येत आहे. या योजनेच्या पुढच्या टप्प्यात आता महिला स्वयंसहायता गटांच्या सहभागातून ‘लाडकी बहीण नागरी सहकारी पतसंस्था’ स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी महिलांनी पुढे येऊन संस्थांच्या नोंदणीसाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे येथील मनोज चौधरी यांनी केले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
![]() |
| - Advertisement - |
🔹 गाव कार्यक्षेत्रासाठी:
- किमान प्राथमिक सभासद संख्या: २५०
- भागभांडवल: १.५ लाख रुपये
🔹 तालुका किंवा नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी:
- किमान प्राथमिक सभासद संख्या: ५००
- भागभांडवल: ५ लाख रुपये
🔹 जिल्हास्तरावरील संस्था स्थापन करण्यासाठी:
- किमान प्राथमिक सभासद संख्या: १५००
- भागभांडवल: १० लाख रुपये
सदर संस्थेची रचना करताना महापालिका, नगरपालिका, वॉर्ड, प्रभाग किंवा तालुका यांचे कार्यक्षेत्र विचारात घेण्यात येणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही संधी ऐतिहासिक ठरेल असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
![]() |
| - Advertisement - |
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



