धुळे दर्पण न्यूज :- सामाजिक न्यायाचे अध्वर्यू, शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते आणि बहुजन समाजासाठी जीवनभर झटणारे लोकप्रिय राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २६ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता गरुड कॉलनी, नकाणे रोड, देवपूर, धुळे येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात उत्साहात पार पडला.

  कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजराजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

  ज्येष्ठ पदाधिकारी पी.सी. पाटील यांनी जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन एस.आर. पवार यांच्या हस्ते पार पडले.
- Advertisement -

  त्यानंतर शिक्षक परिषद अध्यक्ष बी.ए. पाटील, कार्याध्यक्ष अविनाश पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या सिमाताई वाघ, मनिषाताई पवार, वसुमतीताई पाटील, नूतनताई पाटील यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक मानवंदना देण्यात आली.

 यानंतर "जिजाऊ वंदना" पार पडली. कार्यक्रमास एस.एम. पाटील, नितीन पाटील, गुलाबराव देवरे, राजेंद्र मोरे, संजय पाटील, पी.एन. पाटील, डी.एल. पाटील, संदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वय धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -