धुळे दर्पण न्यूज :- राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) अधिनियम, २०२५ अंतर्गत आजपासून – १ जुलै २०२५ पासून – राज्यभरात नवीन कर दर लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. चारुदत्त व्यवहारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
नवीन कर दरानुसार विविध प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील करात बदल करण्यात आले असून, वाहनाच्या किंमतीनुसार वेगवेगळे कर दर निश्चित करण्यात आले आहेत.
![]() |
| - Advertisement - |
🔸 खाजगी CNG/ LPG दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी कर दर:
🔹 बॅटरीवर चालणारी वाहने (इलेक्ट्रिक)
▪️ वाहनाची किंमत ₹३० लाखांपेक्षा अधिक असल्यास – ६% कर
🔸 बांधकाम क्षेत्रासाठी वापरली जाणारी वाहने:
▪️ क्रेन्स, कॉम्प्रेसर्स, प्रोजेक्टर्स, खनित्रे इत्यादी वाहनांवर – ७% कर (एकरकमी स्वरूपात)
![]() |
| - Advertisement - |
🔹 हलकी मालवाहतूक वाहने (७५०० किलोपेक्षा कमी नोंदणीकृत वजन)
▪️ माल वा सामग्री वाहतुकीसाठी वापरली जाणारी वाहने – ७% एकरकमी कर
या सुधारीत कर संरचनेचा अंमल आजपासून म्हणजेच १ जुलै २०२५ पासून सुरू होत असून, राज्यातील सर्व मोटार वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यावरणपूरक इंधनांवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



