धुळे दर्पण न्यूज :- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवा-तपासणीसाठी धुळे शहरात एबी फाउंडेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी" हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत शहरात दाखल झालेल्या दिंडीतील सुमारे ३०० हून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा, आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शहरातील सुभाष चौक ते वीर भगतसिंह चौक परिसरात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ही सेवा करण्यात आली. शिंदखेडा येथील बालाजी संस्थानचे मठाधिपती मेघः श्याम महाराज बुवा यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दिंडीतील महिला व पुरुष वारकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

- Advertisement -

  या उपक्रमात वारकऱ्यांना चालून थकवा, पायांमध्ये वेदना, डोकेदुखी, सर्दी-खोकला, ताप, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, अपचन आदी तक्रारींवर तातडीने तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. विशेषतः वारकऱ्यांच्या पायांची मालिश करून त्यांना आरामदायक सेवा देण्यात आली, यामुळे अनेक वारकरी भारावून गेले.

  या शिबिरात डॉ. निखिल पाटील, डॉ. उज्ज्वला सुभेदार यांच्यासह वैद्यकीय पथकाने कार्य केले. एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे, पप्पू डापसे, चंद्रकांत पोद्दार, डॉ. योगेश पाटील यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी मेघः श्याम महाराज बुवा यांच्या हस्ते वारकऱ्यांना मोफत औषधी कीटचे वाटप करण्यात आले. या औषधी किटमध्ये दिंडी दरम्यान लागणाऱ्या आवश्यक गोळ्या, मलम, थर्मामीटर व प्राथमिक उपचार साहित्याचा समावेश होता. पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात त्याचा वापर करता येईल अशी सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

  यापूर्वीही एबी फाउंडेशनने वणी येथील सप्तशृंगी गड दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली होती. पंढरपूरच्या दिंडीतही हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून, अशा सामाजिक उपक्रमांद्वारे वारकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन मेघः श्याम महाराज यांनी यावेळी केले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  "वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलसेवा" या भावनेने प्रेरित होऊन एबी फाउंडेशनच्या या उपक्रमाने सामाजिक कार्यात नवा आदर्श निर्माण केला आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -