Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
२३ ठिकाणी कचरा संकलन केंद्र निश्चित
बकरी ईदसारख्या मोठ्या सणादरम्यान शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने मुस्लिमबहुल भागात एकूण २३ ठिकाणी कचरा संकलनासाठी केंद्रे निश्चित केली आहेत. या ठिकाणी कचरा उचलण्यासाठी विशेष वाहनांची आणि मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट पोशाख (युनिफॉर्म) देखील दिले जाणार आहेत. कचरा वाहतुकीसाठी नियोजित मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, जेणेकरून शहरातील इतर वाहतुकीवर परिणाम होणार नाही.

- Advertisement -
उघड्यावर मांस विक्रीस बंदी

सणाच्या दिवशी उघड्यावर मांस विक्री होणार नाही, यासाठी महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. सर्व स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रभारी आयुक्त डहाळे यांनी दिला आहे.
स्वच्छता आणि सुविधा व्यवस्था बळकट
शहरातील मुस्लिम बांधवांचे वास्तव्य असलेल्या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता करणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. कोणत्याही विभागाकडून अकार्यक्षमता आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही डहाळे यांनी स्पष्ट केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
बैठकीस उपस्थित मान्यवर
या बैठकीस उपायुक्त हेमंत निकम, शोभा बाविस्कर, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, सहायक आयुक्त किशोर सुडके, पोलिस निरीक्षक दीपक पाटील, धनंजय पाटील, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी, अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसा, पशुवैद्यकीय अधिकारी, तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
"बकरी ईद हे धार्मिक सौहार्दाचे प्रतिक असलेला सण असून, शहरात शांतता व स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, अन्यथा कडक कारवाई टळणार नाही," असा स्पष्ट इशारा प्रशासक डहाळे यांनी बैठकीदरम्यान दिला.
सार्वजनिक सहकार्याचे आवाहन
महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, सणाच्या दिवशी स्वच्छता राखण्यात प्रशासनाला सहकार्य करावे, उघड्यावर कचरा फेकू नये, तसेच निर्धारित नियमांचे पालन करावे. कुठल्याही प्रकारचा अनुशासनभंग झाल्यास, संबंधित व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्यात येईल.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


