– सैय्यद सानिल, मुख्य संपादक, धुळे दर्पण


  धुळे दर्पण न्यूज :- "सरकारची नोकरी म्हणजे आयुष्यभराची शाश्वती!" – ही भावना आजही लोकांच्या मनात घट्ट रुजलेली आहे. पण या नोकरीत पोहोचल्यावर काही अधिकारी-कर्मचारी सरकारी खुर्चीचा गैरवापर करत सामान्य जनतेची लूट करायला लागतात. याचंच जिवंत उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाया.

११ सापळ्यात १५ लाचखोर जाळ्यात

  जानेवारी २०२५ पासून मे महिन्यापर्यंत धुळे जिल्ह्यात एसीबीने ११ ठिकाणी सापळे रचले आणि १५ जणांना रंगेहाथ पकडलं. यामध्ये केवळ शासकीय अधिकारीच नव्हे, तर लाच घेण्यात दलाली करणाऱ्या ५ खासगी पंटरांचाही समावेश आहे.

महसूल विभाग 'लाचखोरीत' अव्वल

  या पंधरा आरोपींपैकी महसूल विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या पाठोपाठ पोलिस विभाग, अन्न व औषध प्रशासन, वीज वितरण, भूमी अभिलेख, शिक्षण आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी पोलिस विभाग सर्वाधिक लाचखोरांमुळे चर्चेत होता – तब्बल १४ पोलीस अधिकारी लाच घेताना पकडले गेले होते.
- Advertisement -

‘क्लास वन व टू’ अधिकारी आघाडीवर

  गेल्या वर्षभरात झालेल्या कारवायांमध्ये ‘क्लास वन’ दर्जाचे दोन अधिकारी आणि ‘क्लास टू’ दर्जाचे आठ अधिकारी लाच घेताना सापडले आहेत. भरघोस पगार असूनही लाचेचा मोह त्यांना सुटत नसल्याचं स्पष्ट होतं.

मार्च महिन्यात लाचखोरीचे सर्वाधिक सापळे
एसीबीच्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ मध्ये सर्वाधिक ४ यशस्वी कारवाया झाल्या आहेत. यावरून असे स्पष्ट होते की, काही महत्त्वाच्या कामांच्या डेडलाईनच्या काळात लाच घेण्याच्या घटना वाढतात.

भरमसाठ पगार असूनही समाधान नाही!

  शासकीय नोकरदारांना मिळणाऱ्या पगाराची रक्कम काही विभागांत लाखोंमध्ये असते. तरीही पैशांच्या हव्यासाने लाच घेणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. हा दुर्दैवी प्रकार लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

‘लाच देणे आणि घेणे’ दोन्ही गुन्हा

  धुळे एसीबीचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, “कोणत्याही शासकीय कामासाठी जर कुणीही पैशांची मागणी करत असेल, तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा. लाच देणे आणि घेणे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे.”
- Advertisement -


लाचखोरीविरोधातील विभागनिहाय आकडेवारी :

विभाग अटक झालेली संख्या
महसूल
पोलिस
जिल्हा परिषद
अन्न व औषध प्रशासन
वीज वितरण विभाग
भूमी अभिलेख
शिक्षण विभाग
पोलिस पाटील
सरपंच
खासगी इसम
एकूण १५


वाचकांनी काय करावं?

  जर आपल्या कामासाठी शासकीय अधिकारी वा कर्मचारी लाच मागत असेल, तर त्वरित खालील नंबरवर संपर्क करा :

📞 02562-230020 / 1064 (टोल फ्री)


(अधिकाऱ्यांची नावे आणि प्रकरणांची सविस्तर माहिती मिळाल्यास पुढील विशेष लेखात प्रकाश टाकण्यात येईल.)


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम


- Advertisement -