धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि थेट जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी (दि. ११) दुपारी घडली. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या घटनेची तक्रार दीपक युवराज पगारे (वय ४१, रा. धुळे), हे शिरुड युनिटमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) म्हणून कार्यरत असून, त्यांनी पोलिसांत लेखी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी सागर रविंद्र हरळ हे बोरकुंड गावात वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी गेले होते.

- Advertisement -

  तेव्हा त्यांनी गावातील विकास धुडकु माळी (वय २४) याच्याकडे वीज बिलाची थकबाकी भरण्याची मागणी केली. मात्र, विकास माळी याने अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीच्या भाषेत बोलत, "मी काहीही थकबाकी भरणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करून घ्या," अशी गर्विष्ठ प्रतिक्रिया दिली. एवढ्यावरच न थांबता, त्याने "तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही," अशी थेट जिवे मारण्याची धमकीही दिली.

  यावेळी त्याने पगारे आणि हरळ यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अशा प्रकारच्या घटनांमुळे काम करताना सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही गंभीर विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  धुळे तालुका पोलिसांनी या प्रकरणी संबंधित आरोपी विकास माळी याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला असून, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -