धुळे दर्पण न्यूज :- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या वतीने "एक पेड मा के नाम" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'DAY-NULM – Women For Trees: An AMRUT Mitra Initiative' अंतर्गत हा उपक्रम परिमल कॉलनी, शिरे कॉलनी जवळील पाण्याच्या टाकीच्या प्रांगणात पार पडला. महिलांच्या सशक्त सहभागातून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या कार्यक्रमात मनपाचे प्रोजेक्ट ऑफिसर श्री. गणेश खोंडे सर आणि सुनिता निकम मॅडम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित महिलांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देत झाडांचे संवर्धन हा काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी "एक पेड मा के नाम" उपक्रमाची रूपरेषा सांगत महिलांना प्रेरणा दिली की, आपण आपल्या मातांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा त्यांच्या सन्मानार्थ एक झाड लावावे व त्याचे पालनपोषण करावे.

- Advertisement -

  कार्यक्रमास महिला बचत गटाच्या अनेक सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिला बचत गटाच्या अध्यक्षा प्रभागी परदेशी, सचिव मीरा सरोज मोराने यांनी सहभाग घेत महिलांना संघटित करण्याचे काम केले. कविता खैरनार, रूपाली पाटील, शितल पाटील, अनिता गायकवाड, रेखा पारधी, वैशाली पाटील, पुनम पाटील, सुवर्णा पाटील, रीता पाटील, लता पाटील आणि इतर अनेक महिलांनी स्वतः झाडं लावून त्यांची जबाबदारी स्वीकारली.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या उपक्रमात महिलांनी "माझं झाड, माझी जबाबदारी" हे सूत्र आत्मसात करत पर्यावरण रक्षणाचे व्रत घेतले. महिलांच्या या उत्साहवर्धक सहभागामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, भविष्यात अधिकाधिक महिला पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  धुळे महानगरपालिका आणि DAY-NULM च्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक होत असून, या कार्यक्रमामुळे सामाजिक जाणीवा अधिक जागृत होतील, असे चित्र दिसत आहे.

सैय्यद सानिल | धुळे दर्पण

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -