📰 व्यापाऱ्याला मारहाणीने मनपा हरकतली
🚨 पोलिस बंदोबस्तात पाचकंदील चौकात अतिक्रमण हटाव; व्यापारीवर्गात समाधान, पण सातत्य हवेच!
      पाचकंदील चौकात मोठा बदल

  धुळे दर्पण न्यूज :- शहरातील जुना आग्रा रोड आणि पाचकंदील चौकातील वाहतूक कोंडी, रस्त्यावरचा गोंधळ, आणि अतिक्रमणाची दीर्घकाळची समस्या आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. काल रात्री एका तरुण व्यापाऱ्यास अतिक्रमण करणाऱ्या टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे प्रशासनाला जाग येऊन आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलिस बंदोबस्तात मोठी कारवाई केली.

🚗 पाचकंदील चौक म्हणजे तारेवरची कसरत!

  शहरातील मुख्य मार्ग असलेल्या जुन्या आग्रा रोडवरून प्रवास करणे हे सामान्य नागरिकांसाठी आणि वाहनधारकांसाठी दिव्य बनले आहे. दुचाकीस्वारांनाही वाट काढताना नाकीनऊ येतात, तर चारचाकी गाड्यांना रस्ता पार करताना १५ ते २० मिनिटांचा वेळ लागत आहे. रस्त्यावर हातगाड्या, दुकानदारांचे थाटलेले बस्तान आणि ठिकठिकाणी लावलेल्या वस्तू यामुळे या परिसरातील वाहतूक जवळजवळ ठप्प होत आहे.

- Advertisement -

🔥 व्यापाऱ्याला बेदम मारहाण

  दि. १ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अक्षय अरूण बोहरा (वय ३०, रा. गुरु गणेश ड्रेसेस, जुना आग्रा रोड) हे आपल्या मित्रासह कारने गुरुद्वाराकडे क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. पाचकंदील चौकात टर्न घेण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्यांमुळे त्यांना अडथळा निर्माण झाला. त्यांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केली, परंतु त्याचा राग येऊन फैजान सलीम बागवान, सुलेमान युसुफ बागवान, जुनेद आसिफ बागवान, समीर आसिफ बागवान आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींनी अक्षय यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय कैलास माळी करीत आहेत.


🏗️ महापालिकेची धडक कारवाई

  ही घटना घडल्यानंतर महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक एक्शन मोडमध्ये आले. आज सकाळी पोलिस बंदोबस्तात पाचकंदील चौकात अतिक्रमण हटविण्यात आले. महापालिकेची कारवाई सुरू होताच, अनेक हातगाडीवाले आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनी स्वतःहून आपले साहित्य उचलून घेऊन तेथून निघाले. काहींनी जवळच्याच गल्लीबोळांमध्ये आपले ठाणे पुन्हा बसवले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

😤 तात्पुरती कारवाई की कायमस्वरूपी?

  पाचकंदील चौकातील आजचा मोकळा रस्ता पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले, मात्र अनेकांनी यावर शंका व्यक्त केली की, ही कारवाई फक्त एका घटनेपुरतीच मर्यादित राहणार का? कारण यापूर्वी देखील अशीच कारवाई झाली असून काहीच दिवसांतच अतिक्रमण परत जागेवर दिसते.

- Advertisement -

🧍‍♂️ व्यापारी आणि नागरिकांचा सवाल

  शहरातील व्यापारी व नागरीक विचारत आहेत की, एखाद्या घटनेनंतरच प्रशासन जागे का होते? अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी सतत लक्ष ठेवणारे विशेष पथक असायला हवे. शहराच्या सौंदर्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे अत्यावश्यक आहे.


📌 मुख्यसंपादन : सैय्यद सानिल
🗞️ धुळे दर्पण – तुमच्या परिसरातील खरी बातमी, तुमच्याच भाषेत!

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -