धुळे दर्पण न्यूज :- शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर असलेल्या तिरंगा चौकात तीन अज्ञात व्यक्तींनी बस वाहकाला भररस्त्यात वाहनातून खाली ओढून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध आझाद नगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे तिरंगा चौकातून एक खाजगी प्रवासी बस पुढे जात होती. या मागून येणाऱ्या दुसऱ्या बसमध्ये चालक म्हणून ज्ञानेश्वर रामदास मासाळ (वय ३४) हे कर्तव्यावर होते. दरम्यान, पुढील बसजवळ अचानक एक दुचाकीस्वार स्वतःच्या चुकीमुळे पडला. दुचाकीस्वाराने वाद न घातल्याने त्या बसने आपला प्रवास सुरू ठेवला. मात्र, मासाळ यांच्या बसजवळ नागरिकांची गर्दी झाली.

- Advertisement -

  ज्ञानेश्वर मासाळ यांनी प्रसंगावधान राखत गर्दीला सांगितले की, "बसमध्ये प्रवासी आहेत, आम्हाला पुढे जाऊ द्या." मात्र, या साध्या विनंतीवरूनच गर्दीतील तीन व्यक्तींनी अचानक आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मासाळ यांना जबरदस्तीने बसमधून खाली ओढले आणि शिवीगाळ, दमदाटी करत ठोसेबाजी केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि प्रवाशांच्या समोर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकारामुळे बसमध्ये असलेले प्रवासीही घाबरले. या तिघांनी मारहाण केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर माहिती मिळताच आझाद नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तिघा संशयितांना ओळखले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

  दरम्यान, शासकीय कर्तव्यावर असलेल्या बस चालकास अशा प्रकारे मारहाण होणे हे गंभीर असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  या प्रकरणी आझाद नगर पोलिसांनी अज्ञात तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली (शासकीय कामात अडथळा, मारहाण, दमदाटी) गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.

_______________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -