धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या पुढाकाराने एआयआयबी (Asian Infrastructure Investment Bank – एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक) योजनेअंतर्गत शिंदखेडा मतदारसंघात ११४ कोटी रुपयांच्या निधीतून भक्कम वीज प्रकल्प उभारणीस सुरुवात झाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा एक भाग म्हणून शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र.न. येथे ३३/११ केव्ही क्षमतेच्या नवीन उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या वेळी दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पाटील, उपविभागीय अभियंता सदानंद मोथगिरे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष भारत ईशी, भाजप तालुकाध्यक्ष दीपक बागल, मुंबई बाजार समितीचे संचालक जिजाबराव सोनवणे, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, डी. एस. गिरासे, हर्षवर्धन बागल, तावखेडा सरपंच जालीमसिंग गिरासे, मंदाणे सरपंच सुनील माळी, सहाय्यक अभियंता विकास गायकवाड, सचिन पवार, शैलेश सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
मतदारसंघात वीज सुविधा भक्कम करण्यासाठी राबवली जाणारी कामे:
एआयआयबी योजनेच्या माध्यमातून शिंदखेडा मतदारसंघात वीजवाटपाच्या आणि वितरणाच्या सुधारणा करण्यासाठी विविध स्तरावर कामे सुरू आहेत. त्यामध्ये प्रमुखतः पुढील प्रकल्पांचा समावेश आहे:
- रामी व बळसाणे उपकेंद्रांची उभारणी
- चिमठाणा येथे १० एमव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर
- शिंदखेडा तालुक्यात १० सौर प्रकल्पांची उभारणी – एकूण ५२ मेगावॅट क्षमतेचे
- विखरन येथे ५ एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर
- सुमारे ६० किमी लांबीच्या ३३ केव्ही लाईनचे बांधकाम
- शिंदखेडा, दळवाडे, विखरन व बामणे उपकेंद्रांवर कॅपेसिटर बँक बसवण्याचे काम सुरू
या सर्व कामांमुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा अधिक कार्यक्षम, स्थिर व विश्वासार्ह होणार आहे. अनेक गावांना पुरेसा आणि स्थिर व्होल्टेज मिळाल्याने शेती आणि औद्योगिक उपक्रमांनाही चालना मिळेल, असे मंत्री जयकुमार रावल यांनी याप्रसंगी सांगितले.
‘शक्तीचा आधार – प्रगतीचा निर्धार’
या प्रकल्पांमुळे शिंदखेडा मतदारसंघाच्या ग्रामीण भागात वीज वितरणातील त्रुटी दूर होणार असून, शेतकऱ्यांच्या शेतीला वेळेवर वीज मिळून उत्पादनात वाढ होणार आहे. या योजनांद्वारे मतदारसंघातील नागरिकांचा विकास आणि जीवनमान उंचावण्याचा निर्धार रावळ यांनी व्यक्त केला.
__________________________________________
........................................................................
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



