🔶 संपूर्ण ऑडिटनंतरच सुरू झाली वाहतूक
सार्वजनिक बांधकाम विभागाने मे महिन्यात पावसाळ्यापूर्वी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. यात पुलाची दगडी रचना बऱ्याच ठिकाणी कमकुवत झाली असून, केवळ हलक्या वाहनांसाठीच वापरण्याजोगी असल्याचे नमूद करण्यात आले. त्यानुसार आवश्यक तेवढी डागडुजी केल्यानंतर सध्या पूल कार, दुचाकी आणि रिक्षांसाठी खुला करण्यात आला आहे.
🔶 पुलावरील धोकादायक स्थिती कायमच
प्रत्यक्ष पाहणीत पुलाच्या अनेक भागांमध्ये दगडांचे पापुद्रे निघालेले दिसतात. दगडांच्या फटीतून झाडांच्या मुळे व फांद्या बाहेर पडत असून, हे झाडे वाढल्याने पुलाच्या संरचनेवर अतिरिक्त ताण येतो. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंनी झाडांच्या फांद्या पुलाखालूनही वाढलेल्या दिसून येतात. हे सर्व घटक दुर्घटनेची शक्यता वाढवणारे आहेत.
![]() |
| - Advertisement - |
🔶 अवजड वाहतूक बंद असूनही...
सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ वर्षांपूर्वीच या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली होती. तरीही अजूनही काही वेळा ट्रक, ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने पुलावरून जात असल्याचे नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले. याबाबत पोलिसांनी कडक नजर ठेवणे आणि ठिकठिकाणी सूचना फलक लावणे अत्यंत गरजेचे आहे.
🔶 शहरातील इतर पूलांचीही दुरवस्था
धुळे शहरात पांझरा नदीवर एकूण नऊ पूल आहेत, त्यापैकी चार पुलांची स्थिती अंशतः खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सिंधी कॉलनीकडील पूल आणि मोठा पूल विशेषतः धोकादायक आहेत. महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पूलांची तातडीने दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
🔶 जबाबदारी कुणाची?
या पुलावरून पोलिस चौकीजवळूनच वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत नियम मोडले जात असतील, तर त्याची जबाबदारी नेमकी कुणावर असेल? सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले काम केले आहे, पण देखरेख आणि अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणा आणि महापालिका जबाबदार असल्याचा मुद्दा उभा राहतो.
![]() |
| - Advertisement - |
🔶 प्रशासनाने घ्यावे तातडीचे पाऊल
मोठा पूल शहराच्या मुख्य बाजारपेठेला जोडणारा असल्याने येथे दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा होते. अशा महत्त्वाच्या पुलावरून अजूनही अवजड वाहतूक होत असेल, तर भविष्यातील संभाव्य दुर्घटनांची जबाबदारी प्रशासनावरच येईल. तातडीने फलक लावणे, वाहतूक पोलिसांची नेमणूक आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवून देखरेख करण्याची गरज आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



