धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील कावठी गावात एका तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोठ्याला लागलेल्या आगीतून जनावरांची सुटका करत असताना झालेल्या वादातून ही मारहाणीची घटना घडल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
सुनीता शुभम सूर्यवंशी (वय अंदाजे ३०, रा. कावठी, ता. धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १० जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या म्हशीच्या गोठ्याला अचानक आग लागल्याची माहिती त्यांच्या भावाच्या मित्राकडून मोबाईलवरून मिळाली. ही माहिती मिळताच त्या तातडीने आपल्या वडील संभाजी शिंदे आणि भाऊ अमोल शिंदे यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या.
![]() |
| - Advertisement - |
आग लागलेल्या गोठ्यात त्यांची म्हैस व वासरे अडकलेली असल्याने त्यांनी तातडीने जनावरांची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. या वेळी गावातील पंढरीनाथ भिला शिंदे, रवींद्र भिला शिंदे, शुभम रवींद्र शिंदे आणि कल्पना पंढरीनाथ शिंदे हे चौघे तेथे आले. गोठ्याला आग कशी लागली याबाबत विचारणा केली असता, त्यांनी रागाच्या भरात सुनीता यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
वादाच्या नादात चौघांनी सुनीता यांना शिवीगाळ केली आणि शारीरिक मारहाण सुरू केली. विशेषतः रवींद्र भिला शिंदे यांनी हाताने मारहाण केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सुनीता यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या प्रकरणामुळे कावठी गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मारहाण प्रकरणाचा संपूर्ण तपास देवपूर पोलीस करत असून, पुढील कार्यवाहीसाठी आरोपींचा शोध घेतला जात आहे.


