धुळे दर्पण न्यूज :- जन्म किंवा मृत्यू ही जीवनातील अपरिहार्य व निर्णायक घटना. या घटनांची नोंदणी शासनाकडे करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असून, १९६९ पासून लागू असलेल्या जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियमानुसार संबंधित घटनेपासून २१ दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, धुळे शहरासह ग्रामीण भागात अजूनही यासंदर्भात जनजागृतीचा अभाव असल्यामुळे अनेक नागरिक नोंदणीस विलंब करतात. परिणामी, जन्म वा मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांना प्रशासनाच्या हेलपाट्यांचा सामना करावा लागतो.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
पोलिस अभिप्राय बंधनकारक
राज्य शासनाने यावर्षीपासून परदेशी नागरिकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे ग्रामसेवक, महापालिकेतील निबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसारच जन्म व मृत्यूच्या नोंदी घेतल्या जात आहेत. अर्जाच्या तपासणीत आता पोलिस विभागाचा अभिप्राय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे खोट्या कागदपत्रांवर जन्म वा मृत्यू दाखले मिळवणे अशक्य बनले आहे.
![]() |
| - Advertisement - |
प्रमाणपत्रासाठी विलंब शुल्क अनिवार्य
२१ दिवसांच्या आत नोंदणी न केल्यास नागरिकांना विलंब शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर अतिरिक्त कागदपत्रे व साक्षीदारांची उपस्थिती देखील आवश्यक असते. विशेषतः ग्रामीण भागात अजूनही नोंदणीची प्रक्रिया माहिती नसल्याने बरेच नागरिक मागे पडतात. यावर उपाय म्हणून शासनाने जनजागृती मोहिमेची गरज अधोरेखित केली आहे.
नवीन कायदा, नवीन अटी
जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) कायदा २०२३ नुसार, १ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्र हे पासपोर्टसाठी आवश्यक दस्तऐवज झाले आहे. त्यामुळे जन्माच्या ठिकाणची नोंद अत्यंत अचूक असावी लागते. यापूर्वी जन्मलेल्या लोकांसाठी पर्यायी कागदपत्रांचा पर्याय दिला असला, तरी नवीन अर्जदारांसाठी फक्त जन्म प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाते.
जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया :
- जन्माची नोंदणी - स्थानिक स्वराज्य संस्थेकडे विशेष फॉर्म भरून सादर करणे आवश्यक.
- मृत्यू नोंदणी - संबंधित प्राधिकरणाकडे कागदपत्रांसह फॉर्म सादर करावा लागतो.
- नोंदणीची वेळ मर्यादा - घटनेपासून २१ दिवसांत नोंदणी करावी.
- ६ महिन्यांनंतर नोंदणी - विशेष परवानगी आवश्यक; काही ठिकाणी १ वर्षानंतर न्यायालयीन प्रक्रियेची गरज.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
चुकीच्या माहितीवर फौजदारी कारवाई
नोंदणीसाठी सादर केलेली माहिती खोटी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. हे प्रकरण अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्यामुळे त्यावर अचूकपणे आणि कायदेशीर तरतुदीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी संबंधित नोंदीची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि भौगोलिक स्थळांचा पुरावा आवश्यक आहे.
![]() |
| - Advertisement - |
नियमांचे पालन करा, जन्म-मृत्यूची नोंद वेळेत करा!
.jpeg)


