धुळे दर्पण न्यूज :- गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे हे निवेदन सादर केले. यामध्ये शेतकऱ्यांना विविध स्तरांवरील मदतीची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

  • शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून त्यांना भरपाई द्यावी.
  • नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५०,००० प्रोत्साहन अनुदान द्यावे.
  • निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने दिलेल्या सरसकट कर्जमाफीच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी.
  • संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनांचे थकीत लाभ लाभार्थ्यांना तातडीने द्यावेत.
- Advertisement -

  शेतमालाला हमीभाव मिळावा, बँका शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेले अनुदान परस्पर त्यांच्या कर्ज खात्यात वळवतात, हा प्रकार अन्यायकारक असून शासनाने यावर कठोर पावले उचलावीत, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

  कृषी खात्याचे अपयश अधोरेखित करताना, अप्रमाणित बियाणे व खतांची लिंकिंग रोखण्यात शासन अपयशी ठरले असल्याचा आरोपही करण्यात आला. गुजरात येथून आलेल्या ₹१९ लाखांच्या अप्रमाणित बियाण्यांची कारवाई ही गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

  कांद्याच्या नुकसानीचा मुद्दा मांडत शिवसेनेने सडलेल्या कांद्यामुळे आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान ₹२५,००० इतकी मदत देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

विजेच्या समस्या गंभीर!
शिवसेनेच्या प्रतिनिधींनी विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावरही ताशेरे ओढले.

  • १५-१५ तास विज पुरवठा खंडित होतो.
  • ट्रान्सफॉर्मर जळाल्यावर बदलायला विलंब होतो.
  • जीर्ण तारा व पोल तातडीने बदलावेत.
  • जास्त भाराच्या भागात नवीन डीपीची व्यवस्था करावी.
  • लाईनमनसाठी आधुनिक सुरक्षा साधनांचा पुरवठा करावा.

  शासनाने या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

या वेळी उपस्थित होते
  अतुल सोनवणे (जिल्हाप्रमुख), कैलास पाटील (उपजिल्हाप्रमुख), विलास चौधरी (जिल्हा समन्वयक), प्रशांत भदाणे, बाबाजी पाटील, जनार्धन मासुळे, हेमराज पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश वाघ, अजय चौधरी, आनंद जावडेकर, विश्वनाथ सोनवणे, विजय चौधरी, जगदीश पाटील, माणिक कोळी, अनिता गिरासे, गुलाब धोबी, तेजस सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
______________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -