धुळे दर्पण न्यूज :- जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसलेले श्री क्षेत्र खर्ची (सिद्धचंद्रवट) हे सप्तश्रृंगी देवीचे माहेरस्थान असून, या ठिकाणाचा उल्लेख पुराणांमध्ये स्पष्टपणे आढळतो. तरीही हे पवित्र तीर्थक्षेत्र आजही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. भाविकांना देवीच्या माहेराचे महत्त्व समजावे आणि या धार्मिक स्थळाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, यासाठी या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी मागणी ओंकार माधवानंद नर्मदेश्वर धाम ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
ही माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खर्ची क्षेत्राची ऐतिहासिक व आध्यात्मिक पार्श्वभूमी
स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितले की, सप्तश्रृंगी देवीचा अवतार या भूमीत घडून ९ हजार वर्षांचा कालखंड पूर्ण झाला आहे. याच पवित्र स्थळी शिव-पार्वतींचा एकल्प गौप्यवास होता, तर याच भूमीत अष्टभैरवांच्या निमित्ताने आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्म झाला.
![]() |
| - Advertisement - |
महिषासुराचा वध करण्यासाठी माता पार्वतीने याच ठिकाणी सिंहावर आरूढ होत अष्टभुजा अवतार घेतला, ही घटना अत्यंत धार्मिकदृष्ट्या पवित्र मानली जाते. त्यामुळे हे क्षेत्र केवळ खान्देशचाच नाही तर संपूर्ण देशाचा अध्यात्मिक ठेवा आहे.
विकास कामांची गरज तातडीची
आज या क्षेत्रात रस्त्यांची सुधारणा, पूल, भाविकांसाठी निवास व्यवस्था (भक्त निवास), अन्नक्षेत्र, तीर्थकुंड, लाईटिंग व्यवस्था व एक प्रशस्त सभामंडप आदी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
भाविकांची संख्या वर्षभर मोठी असते, परंतु अर्धवट सुविधा व प्रचाराच्या अभावामुळे हे क्षेत्र अद्यापही गोंधळात आहे. सरकारने तसेच धर्मप्रेमी दात्यांनी पुढाकार घेऊन हे काम तातडीने हाती घ्यावे, अशी विनंतीही स्वामी माधवानंद सरस्वती यांनी यावेळी केली.
"खर्ची" क्षेत्राचा गौरव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा निर्धार
या पवित्र स्थळाचा महिमा आज खान्देशापुरता मर्यादित न राहता देशपातळीवर पोहोचायला हवा, अशी भावना ट्रस्टतर्फे व्यक्त करण्यात आली. स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या मते, या भूमीचे पुरातनत्व, शक्तिपीठाशी असलेला संबंध व धार्मिक महत्त्व लक्षात घेता, सरकारने या स्थळाचा धार्मिक पर्यटन विकास आराखड्यात समावेश करून विशेष निधी मंजूर करावा.
भाविकांची मागणी : "देवीच्या माहेराचे" जतन करा!
"देवीचे माहेर" म्हणून ओळख असलेल्या या ठिकाणाची ओळख व प्रतिष्ठा जपण्यासाठी स्थानीक प्रशासन, धर्मगुरू, भाविक, इतिहासतज्ञ आणि जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या क्षेत्राचा विकास केल्यास, खान्देशाचा धार्मिक वारसा उजळून निघेल आणि हजारो भाविकांना एक सुसज्ज तीर्थक्षेत्र भेट देण्याची संधी मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

