धुळे दर्पण न्यूज :- देवपुरातील नागरिकांना लक्ष्य करून दागिने लांबवण्याच्या दोन घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्यांची पद्धत, ठिकाण, व अपराधींची भाषा सारखी असल्याने या मागे 'इराणी गँग' असण्याचा पोलिसांना प्रबळ संशय आहे. सध्या देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तपासाची दिशा त्या दृष्टीने आखत आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  देवपूरातील दत्त मंदिर परिसरात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली. अण्णासाहेब पाटील नगरातील रहिवासी असलेले नारायण अर्जुन पाटील (वय ६०) हे कामावर जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. ‘आम्ही पोलिस आहोत’, असे सांगून त्यांनी पाटील यांच्याकडून सोन्याचे दागिने काढून घेण्यास भाग पाडले. ‘पोलिसांकडून लायसन्स तपासणी सुरू आहे, तुम्ही एवढे दागिने घालून का फिरत आहात?’ असा बनाव करत त्यांनी पाटील यांना गोंधळात टाकले.

- Advertisement -

  त्यांनी मदतीचा आव आणत एक कागद दिला व ‘हे दागिने या कागदात बांधून ठेवा, आम्ही सुरक्षा दृष्टीने तपासून देतो’, असे सांगून दोन तोळ्यांची साखळी आणि दोन तोळ्यांचे अंगठ्या घेतल्या. काही क्षणातच या दोघा भामट्यांनी खोट्या कागदात गंडा घालून दागिने लांबवले व तेथून पसार झाले.

  या घटनेनंतर पाटील यांनी देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, या प्रकरणी पोलिसांनी सव्वा लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची नोंद केली आहे. तपास उपनिरीक्षक कैलास दामोदर करत आहेत.

  विशेष बाब म्हणजे, हाच प्रकार अगोदरही या परिसरात घडला होता. गेल्या शनिवारी सकाळी याच दत्त मंदिर परिसरात शकुंतला देविदास ढोले (वय ७५) या वृद्ध महिलेलाही अश्याच पद्धतीने फसवण्यात आले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये एकसारखीच गुन्ह्याची रचना, हिंदी भाषेतील संवाद आणि पोलिस असल्याचा बनाव करण्यात आल्याने, ही कामगिरी 'इराणी गँग'ची असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

  शहरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. वयोवृद्ध नागरिक व महिलांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिस वेशात कोणतीही शंका वाटल्यास त्यांची ओळख तपासावी, अधिकृत ओळखपत्रांची मागणी करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  दरम्यान, दोन्ही घटनांमधील गुन्हेगारांच्या सीसीटीव्ही फूटेजचा शोध सुरू असून, त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळवण्यासाठी तपास गतीने सुरू आहे. नागरीकांनी अशा प्रकारच्या व्यक्तींविषयी तत्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

______________________________________________

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -