धुळे दर्पण न्यूज :- तेल बिया उत्पादन क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने जळगाव येथील तेल बिया संशोधन केंद्र आणि चौगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे तालुक्यातील चौगाव येथे भव्य बियाणे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील २५ गावांतील एकूण १२५ शेतकऱ्यांना मोफत भुईमूग बियाण्यांचे वितरण करण्यात आले.

  या कार्यक्रमामध्ये तेल बिया संशोधन केंद्र, जळगाव मार्फत राज्यात तेलबिया वर्गीय पिकांची लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी विविध प्रोत्साहनपर उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या बियाणे वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुईमूग हे महत्वाचे तेलबिया पीक असून, त्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे ही प्राथमिक गरज आहे. त्यामुळे या योजनेमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

- Advertisement -

  या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ संशोधन सहाय्यक तुषार बिरारी व दिनेश पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रेसर, धुळे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख मनोहर पाटील, कुसुंबा पि. यु. व्यवस्थापक विनोद मासुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या चौगाव परिसर शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने अध्यक्ष सौ. सुरेखा बोरसे, उपाध्यक्ष विनोद हालोर, सचिव रामभाऊ मोरे, संचालक भूषण देवरे, सो. संचालक किरण मोरे, ज्ञानेश्वर शेवाळे, जयेश बोरसे, छोटूलाल सोनवणे, कृष्णा महाले, रामराव खैरनार यांच्यासह अन्य संचालक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशा उपक्रमांद्वारे सरकार आणि संशोधन संस्था शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष मदत करत असल्याचे दृश्य पहायला मिळाले.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -