धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विजेचा लपंडाव सुरू झाल्यामुळे सणासुदीच्या, तसेच व्यावसायिक काळात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वीज ग्राहक वेळेवर देयके भरत असूनही त्यांना सातत्याने होणाऱ्या अपुऱ्या व अस्थिर पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने महावितरणच्या कार्यकारी अभियंता महाजन यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी व महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागातील विजेसंदर्भातील समस्या, नागरिकांचा संताप व तांत्रिक त्रुटी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
⚡ समस्या गंभीर, उपाय आवश्यक:
पावसाळा सुरू होताच वीज पुरवठा तासन्तास खंडित होतो. परिणामी शहरातील जनजीवन विस्कळीत होते. वीज विभागाचे लाईनमन फिल्डवर काम करत असताना नागरिकांचा रोष सहन करावा लागतो. दुसरीकडे महावितरण अधिकारी मात्र थातुरमातुर उत्तरे देत वेळ मारून नेत आहेत. “आग सोमेश्वरी – बंब रामेश्वरी” अशा स्वरूपात संपूर्ण व्यवस्थेची अवस्था झाल्याचे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठासून सांगितले.
🔍 शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:
- लाईनवरील झाडांच्या फांद्या कापणे व मेंटेनन्स – यंदा प्रिव्हेंटीव्ह मेंटेनन्सच न केल्याने समस्या वाढल्या आहेत.
- ट्रान्सफॉर्मर अपग्रेडेशन – 100 KVA चे ट्रान्सफॉर्मर 200 KVA मध्ये त्वरित बदलण्यात यावेत.
- पोल व तारा जीर्ण झाल्या आहेत – नवीन तारा टाकणे, खराब पोल बदलणे आवश्यक.
- नवीन डीपी लावणे – ज्या भागात भार अधिक आहे तिथे नवीन डीपी बसवाव्यात.
- एबी स्वीच दुरुस्ती – अनेक ठिकाणी खराब झालेले स्वीच बदलणे.
- विद्युत पोलांची संख्या वाढवणे – दोन पोलमधील अंतर अधिक असल्याने दुरुस्ती अडचणीत येते.
- लाईनमनसाठी सुरक्षा उपकरणे – अपघात व वेळेवर दुरुस्ती करता यावी यासाठी आधुनिक साधने देणे गरजेचे.
- फॉल्टी मीटर समस्या – चुकीची बीलिंग होत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत, ते तातडीने दुरुस्त करावे.
- अवाजवी वीज बिलांवर नियंत्रण – चुकीच्या पद्धतीने मागील वर्षाच्या सरासरीने बील आकारणे बंद करावे.
- ग्राहक तक्रारींसाठी टोल फ्री जनजागृती – तक्रार नोंदवण्यासाठी अधिक जनजागृती करणे.
- सेक्शन मोबाईल नंबर जाहीर करणे – प्रत्येक सेक्शनचे संपर्क उपलब्ध करून देणे.
![]() |
| - Advertisement - |
🕒 15 दिवसांचा अल्टीमेटम:
शिवसेनेने यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, वरील उपाययोजना पंधरा दिवसांत प्रभावीपणे राबविल्या गेल्या नाहीत, तर महावितरणच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला.
✊ स्थानिकांची सक्रिय उपस्थिती:
यावेळी पंकज गोरे, प्रशांत भदाणे, सागर निकम, सागर साळवे यांनी आपल्या भागातील अडचणी सविस्तर मांडल्या. तसेच सौ. संगीता जोशी, आनंद जावडेकर, आण्णा फुलपगारे, कपील लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, मनिश थोरात, सलीम लांबु, सचिन रुंणवाल, दीपक वाघ, निलेश कांजरेकर, अनिल शिरसाट, इश्तियाक अन्सारी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची उपस्थिती होती.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."



