धुळे दर्पण न्यूज :- नेर धुळ्यात तालुक्यातील नेर गावातील प्रसिद्ध उद्योजक स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री.मनोज वर्मा व सौ. नितू वर्मा यांच्या कन्या खुशी वर्मा च्या वाढदिवसानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून कौतुकास्पद कामगिरी करत केली आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
स्नेहा ज्वेलर्सचे संचालक श्री मनोज वर्मा व सौ नितू वर्मा यांनी आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणाचा समतोल व हरित भविष्य राखण्यासाठी शासनाच्या एक पेड मॉं के नाम या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना सात ते आठ फुटांचे चाळीस आंब्याच्या झाडांची रोपे वाटप करून वाढदिवस साजरा करत गावाला एक आदर्श दिला आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
खुशी वर्मा यांनी बोलताना सांगितले की प्रत्येकाने वाढदिवस असेच साजरे करून दरवर्षी एक तरी झाड लावावे व संगोपन करावे. जेणेकरून आपण पर्यावरणाचे रक्षण करून आपल्या देशातील होणारे प्रदूषण रोखू शकतो व प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम रोखू शकतो. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |

