धुळे दर्पण न्यूज :-  धुळे: शहराच्या मध्यवर्ती भागात, संध्याकाळच्या वेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मुंबईहून आलेल्या दोन ज्वेलर्स कर्मचाऱ्यांना भररस्त्यात लुटून, तीन दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत त्यांच्याकडील तब्बल ३ किलो सोनं असलेली बॅग हिसकावून पळ काढला.

  घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण पसरले असून, कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

🔴 घटनास्थळी काय घडलं?

  प्राथमिक माहितीनुसार, मुंबईस्थित व्ही. एम. ज्वेलर्सचे दोन कर्मचारी – विनय मुकेश जैन आणि किशन मोदी हे शहादा येथे दागिन्यांचे नमुने दाखवण्यासाठी आले होते. शहादा दौरा आटोपून दोघे बुधवारी सायंकाळी एमएच ४० एन ९०२१ या एसटी बसने धुळे शहरात दाखल झाले.


  रात्री सुमारे ८.१० वाजता बस स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात थांबली आणि हे दोघे खाली उतरत होते, तेवढ्यात एका दुचाकीवर तोंड झाकून आलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

- Advertisement -

🔫 हवेत गोळीबारव्यापाऱ्याच्या हातून बॅग हिसकावली

  दरोडेखोरांपैकी एकाने हवेत थेट दोन गोळ्या झाडल्या, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या झटापटीत विनय जैन यांच्या हातातील सोन्याने भरलेली बॅग हिसकावली गेली. त्यानंतर तिघे दरोडेखोर श्री एकविरा देवी मंदिरासमोरून बिलाडी मार्गे फरार झाले.


  ही घटना इतकी झपाट्याने घडली की, दरोडेखोरांचे चेहरेही नीट दिसले नाहीत, अशी माहिती पीडित कर्मचाऱ्यांनी दिली. या बॅगेत सुमारे ३ किलो सोन्याचे दागिने असल्याचा दावा केला जात आहे.


👮 पोलिसांची तत्काळ हालचालचौकशी सुरू

  घटनेची माहिती मिळताच धुळे पोलिस दलात खळबळ उडाली.

  पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी श्रीराम पवार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

  विशेष म्हणजे, दरोडेखोर देवपूर पोलिस ठाण्यासमोरूनच बिलाडी मार्गे पसार झाले, ही बाब धक्कादायक आहे. पोलिसांकडून चौकशीस गती देत नाकाबंदी, सीसीटीव्ही तपासणी आणि वाहनांची झडती सुरू आहे.


"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

🧾 दागिन्यांची पुष्टी अजून बाकी, तपास सुरू

  धुळे शहर पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, "व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारेच नेमकं सोनं किती लुटलं गेलं, याची माहिती मिळेल. सध्या चौकशी सुरू आहे, आणि लवकरच आरोपींना पकडलं जाईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


⚠️ कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  या धाडसी प्रकारामुळे धुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, पोलिस ठाण्याच्या काही मीटर अंतरावरच अशा प्रकारे दरोडा पडणं हे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं.

  व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे. सुरक्षा वाढवावी आणि रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -