धुळे दर्पण न्यूज :-  देवपूरातील गोळीबार करून करण्यात आलेल्या सोनं लूट प्रकरणाचा तपास सध्या वेगाने पुढे जात आहे. अद्याप लुटलेल्या सोन्याचा थांगपत्ता लागलेला नसला, तरी धुळे पोलिसांच्या एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जोरदार मोर्चा उभारला आहे. विशेष म्हणजे तपासाच्या अनुषंगाने जळगाव येथील तब्बल १२ ज्वेलर्सना भेट देत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली असून, शहादा तसेच मुंबई येथेही पथकाने तपासाचे चक्र फिरवले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  बुधवारी (दि. २३) रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेत मुंबईतील एका नामांकित कंपनीचे सेल्समन विनय जैन आणि कर्शन मोदी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून सुमारे दीड किलो सोनं जबरदस्तीने लुटण्यात आलं होतं. या घटनेने धुळे शहरात आणि दागिने व्यावसायिकांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

लूट होण्यापूर्वीच जळगाव दौरा
  या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (दि. २२) विनय जैन आणि कर्शन मोदी हे दोघंही जळगावला गेले होते. तिथे त्यांनी स्थानिक दागिने व्यावसायिकांकडून सोन्याच्या नक्षीकाम व घडवणीसंबंधी ऑर्डर घेतल्या होत्या. लूटीनंतर या गोष्टीकडे विशेष लक्ष देत, एलसीबीच्या पथकाने जळगावमधील १२ ज्वेलर्सना भेटी देऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. या चौकशीत त्यांनी काही महत्त्वाच्या धागेदोऱ्यांचा शोध घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
- Advertisement -

लॉज परिसरातील सीसीटीव्ही तपासणी
  घटनेनंतर तात्काळ गुन्हा एलसीबीकडे वर्ग करण्यात आला. तपास पथकाने धुळेतील लॉज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून काही संशयित हालचालींचा शोध घेतला आहे. याशिवाय काही सराईत गुन्हेगारांकडे देखील सखोल चौकशी सुरू आहे.

शहादा, मुंबईत पथकाची चढाओढ
  फक्त जळगावच नव्हे, तर या प्रकरणाचा संबंध इतर गँग किंवा मध्यस्थांशी असण्याची शक्यता गृहीत धरून पथकाने शहादा व मुंबई येथेही तपास केला. तेथील काही संशयित व्यक्तींशी बोलून माहिती घेतली जात आहे.

  पोलिसांनी जैन आणि मोदी यांच्याकडून लूट होणाऱ्या सोन्याबाबत सविस्तर माहिती मिळवली आहे. हे सोनं कुठल्या दुकानांतून घेतलं, कोणाकडे ऑर्डर दिली, त्यांचं व्यवहार पद्धतीनं कसं होतं – अशा सर्व बाबींचा तपास सुरु आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  दरम्यान, पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर असून, लवकरच या लूट प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहितीही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्यातील दागिने व्यावसायिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -