धुळे दर्पण न्यूज :- शहरातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या अवैध मिनी गॅस पंपांवर धुळे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे. चाळीसगाव रोड आणि आझादनगर पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत सुमारे १ लाख रुपयांच्या किंमतीचे ३६ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटर्स, वजन काटे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

चाळीसगाव रोड येथे छापा
  चाळीसगाव रोड येथील पूर्व हुडको भागात इरफान ऊर्फ ठाकुमुसा मन्सुरी (वय ४५) या संशयित व्यक्तीने सार्वजनिक जागेत मिनी गॅस पंप सुरू केला होता. २५ जुलै रोजी पोलिसांनी कारवाई करत दोन हजार रुपये किमतीचे दोन गॅस सिलिंडर, गॅस भरण्याची एक इलेक्ट्रिक मोटार आणि एक इलेक्ट्रिक वजन काटा असा एकूण ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.
- Advertisement -

पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गॅस व्यवसाय
  काझी प्लॉट परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या मिनी गॅस पंपावर देखील पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस साठा उघड केला. या ठिकाणाहून १२ हजार रुपये किमतीचे ६ गॅस सिलिंडर, ५ हजार रुपये किमतीचा वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोकॉ. मकसूद पठाण यांच्या तक्रारीवरून मकसूद अन्सारी अहमद अब्दुल कुददुस (वय ३२, रा. मच्छीबाजार, धुळे) याच्याविरोधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधवपुरा परिसरात सर्वाधिक मुद्देमाल जप्त
  दुसऱ्या कारवाईत आझादनगर पोलिसांनी २६ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास माधवपुरा येथील गल्ली नं. ४ मध्ये मिनी गॅस पंपावर छापा टाकला. या ठिकाणी संशयित अर्शद अन्सारी हा मिनी गॅस पंप चालवत होता. पोलिसांनी येथे ४८ हजार रुपये किमतीचे २४ गॅस सिलिंडर, १५ हजार रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक मोटार आणि ५ हजार रुपये किमतीचा वजन काटा असा एकूण ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  या सलग तीन कारवायांमुळे धुळे शहरातील अवैध गॅस व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा अवैध मिनी गॅस पंपांमुळे नागरिकांच्या जिवाला आणि परिसरातील सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होतो, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांचे ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -