धुळे दर्पण न्यूज :- साक्री तालुक्यातील बल्हाणे शिवारात पट्टेदार वाघाच्या अचानक झालेल्या धडकबाजीमुळे शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने वनविभागाची झोप उडवली असून, गावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना चेतन भीमराव बिरारीस यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये घडली. रात्रीच्या सुमारास एक पट्टेदार वाघ फार्ममध्ये शिरला आणि अंदाजे ५० हून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला. ही घटना घडताना फार्ममध्येच झोपलेले रखवालदार आणि त्यांचे कुटुंबीय क्षणाचाही विलंब न करता खोलीत लपल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र त्यांनी अनुभवलेला थरार भीषण आणि अंगावर शहारे आणणारा होता.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तो वाघ पांढऱ्या पट्ट्यांसह पट्टेदार स्वरूपात दिसून आला. यामुळे तो वाघ असल्याची शक्यता अधिक ठोस झाली आहे.
![]() |
| - Advertisement - |
सदर पोल्ट्री फार्ममधील नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, चेतन बिरारीस, अविनाश पाटील व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत वनविभागावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीही याच परिसरात वाघासारखा प्राणी दिसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून दिले होते, परंतु त्यावर कुठलाही ठोस बंदोबस्त करण्यात आलेला नव्हता.
ग्रामस्थांची मागणी आहे की, वनविभागाने या वाघाचा तातडीने शोध घेऊन सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. विशेषतः शेतकऱ्यांच्या हालचालीसाठी रात्रीच्या वेळेस धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे परिसरात गस्त वाढवावी आणि शक्य असल्यास पिंजरा लावून वाघाचा बंदोबस्त करावा.
वनविभागानेदेखील शोधमोहीम सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही ठिकाणी कॅमेरे बसवून हालचालींवर लक्ष ठेवण्याचा विचार केला जात आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शेतकऱ्यांचे नुकसान, ग्रामस्थांचा जीव धोक्यात, आणि वन्यप्राण्यांचे जंगलाबाहेरचे वाढते वास्तव्य – या सर्व गोष्टींनी साक्री तालुक्यातील ग्रामजीवन हादरून गेले आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


