धुळे दर्पण न्यूज :- धुळे तालुक्यातील कुंडाणे गावात काल एक निष्ठावंत कार्यकर्ता भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, आज शिवसेनेच्या नेत्यांनी गावात जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करत गद्दारांना जशास तसे उत्तर दिले. "गद्दारी करणाऱ्यांच्या गावातच आता शिवसेनेचा एल्गार होणार" असा निर्धार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी करत भगव्या झेंड्यांच्या मिरवणुकीने संपूर्ण गाव दणाणून सोडले.

  आज झालेल्या या एल्गारात शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुलभाऊ सोनवणे, जिल्हा संघटक भगवान बापूजी करनकाळ, तालुकाप्रमुख बाबाजी पाटील, प्रशांत भदाणे, नितीन पाटील, आणि भैय्या पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. संपूर्ण कुंडाणे गावातून ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. भगवे झेंडे, बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर, जयजयकाराच्या घोषणा, आणि "जय शिवराय! जय महाराष्ट्र!" च्या गर्जना हवेत घुमत होत्या.

- Advertisement -

  अतुल सोनवणे यांनी गद्दारांवर कडाडून टीका करत म्हटले, "शिवसेनेने मोठे केलेल्यांनी गद्दारी करताना चार वेळा विचार करावा. तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा, पण शिवसेनेवर आरोप करताना शंभरदा विचार करा. कुणाला सभापती केले, कुणाला संघटनेतील पदे दिली – तरीही काही माणसं अहंकार आणि स्वार्थासाठी गद्दारी करत आहेत."

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  ते पुढे म्हणाले, "शिवसेना ही कोणत्याही एका व्यक्तीची नाही, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इथे पद नाही, कर्तृत्व बोलतं. आम्ही थांबणार नाही, प्रत्येक गद्दाराला जशास तसे उत्तर देणार!"

कुंडाण्यातील या शक्तिप्रदर्शनाने केवळ त्या गावातील नव्हे, तर संपूर्ण धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलं. यावेळी गावातील अनेक नागरिक, महिला आणि युवकांनी स्वयंस्फूर्तीने या मिरवणुकीत सहभाग घेत भगव्या झेंड्याखाली एकजूट दाखवली.

"ही फक्त सुरुवात आहे, आता देवपूरसारखी महत्त्वाची ठिकाणं बाकी आहेत," असे सांगत सोनवणे यांनी आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.

शेवटी, शुभांगी पाटील म्हणाल्या, "वादळ कितीही आलं तरी बाळासाहेबांचा शिवसैनिक ढळत नाही. तो नेहमी सज्ज असतो. ही चळवळ संपलेली नाही, तर नव्याने पेटली आहे."

कुंडाण्यात झालेल्या या कार्यक्रमाने गद्दारांना धडा शिकवण्याचा एक सुरवातीचा इशारा देण्यात आला असून, पुढे काय घडतंय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम