धुळे दर्पण न्यूज :- माजी आमदार, शिवसेना नेते व कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांना उद्देशून एक सडेतोड, मुद्देसूद आणि थेट आरोप करणारे खुले पत्र प्रसिद्धीस दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राच्या जनतेला सत्यस्थिती समजावी म्हणून, अतिशय स्पष्ट, स्वच्छ व सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर यावी या उद्देशाने व सद्हेतूनच हे पत्र लिहीत आहे.”
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
१) समृद्धी महामार्ग, जो त्यांच्या म्हणण्यानुसार “महामार्ग न राहता समृद्धी महाप्रवाह झाला आहे,”
२) बोगस शिक्षक भरती व गांजा व अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली राज्यातील तरुण पिढी.
“मुख्यमंत्री फडणवीस जनतेला मूर्ख बनवत आहेत”
गोटे यांनी थेट आरोप केला आहे की मुख्यमंत्री रोज नवनव्या घोषणा करून भोळा चेहरा करून नाट्यपूर्ण भूमिका साकारत असून, “भ्रष्टचाऱ्यांची गय केली जाणार नाही” वगैरे घोषणांचा कुठलाही अमलात आणण्याचा उद्देश नसतो, त्या केवळ जनतेला फसवण्यासाठी केल्या जातात.
![]() |
| - Advertisement - |
“मी या सर्व घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार”
गोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “दुर्दैवाने मी भाजपाच्या विधानसभेचा सदस्य होतो आणि या प्रत्येक गोष्टीचा Eye Witness आहे. राज्यातील या सर्व पापांच्या मुळाशी तुमच्याशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.”
मोपलवार प्रकरण : लफडी, भ्रष्टाचार आणि संरक्षण?
गोटे यांनी तत्कालीन वरिष्ठ अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची सविस्तर यादी दिली आहे:
- मोपलवारांचे मुद्रांक घोटाळ्यातील सहभाग
- न्यायालयाची दिशाभूल
- बायकांचे लफडे
- शेकडो कोटी रुपयांचे विवाहबाह्य संबंधातून व्यवहार
- सतीश मांगले यांच्याद्वारे रेकॉर्ड केलेले संभाषणाचे पुरावे
या सर्व पुरावे त्यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
"सभागृहात जरी सत्तारूढ पक्षाचा आमदार होतो तरी..."
विधिमंडळात मोपलवारांचा विषय आला असता, गोटे यांनी विरोधी पक्षाबरोबर उभे राहत त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री यांनी त्या वेळी जाहीर केले होते की चौकशी होईपर्यंत मोपलवार यांना निलंबित करण्यात येईल.
पण गोटे यांनी दावा केला की, “मोफलवारांविरुद्ध CVC, PMO, E.D. कडे तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय चौकशी समिती ही फक्त दिखावा होता.”
त्यांनी याही पुढे जाऊन म्हटले आहे की, “मी जॉनी जोसेफ यांचा अहवाल चार वेळा मागितला. पण तो अधिकृतपणे दिला गेला नाही. मी तो कसा मिळवला, ही माझी गुप्त गोष्ट आहे.”
“फडणवीस यांच्यासारखा कारस्थानी मुख्यमंत्री दुसरा नाही”
गोटे यांनी थेट म्हटले, “इतके मुख्यमंत्री आले आणि गेले, पण तुमच्यासारखा कपटी, कारस्थानी व बेधडक खोटं बोलणारा मुख्यमंत्री नाही. आपल्या कृती व भाषणात ताळमेळ नाही.”
अजित पवार आणि मोपलवारांचे संरक्षण
गोटे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “ज्या अजित पवारांविरोधात पुरावे गोळा केले होते, ते नंतर कुठे गेले? सत्ता मिळवण्यासाठी सगळे विसरले?”
तसेच मोपलवार यांनी २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला शेकडो कोटींचा निधी दिला असल्याचेही त्यांनी आपल्या "माहितगार" कडून समजल्याचे सांगितले. त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
![]() |
| - Advertisement - |
“माझ्या प्रामाणिकतेचा पराभव झाला”
गोटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही पत्रे लिहिल्याचे सांगितले. पण मोपलवारांच्या “शेकडो कोटी रुपयांच्या काळ्या पैशाचे पारडे” अधिक जड ठरल्याचे त्यांनी लिहिले आहे.
“मोपलवारांना सात वेळा मुदतवाढ; पैसा बोलतो”
गोटे म्हणाले, “मोपलवारांना सात वेळा मुदतवाढ मिळाली. ‘ये पैसा बोलता है’ यापेक्षा दुसरे नेमके काय कारण असणार?”
त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याचे आव्हान
गोटे यांनी पत्राच्या अखेरीस मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट जाहीर आव्हान दिले आहे की, “खरोखरच हिम्मत असेल तर, श्री. तुकाराम मुंढे, श्री. प्रवीण गेडाम, श्री. राहूल रेखावार यांची त्रिसदस्यीय समिती नेमा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करून टाक.”
तसेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे की, “घोषणा करू नका, कारण त्या पेलवता येत नाहीत. त्यामुळे जनतेची मान खाली जाते.”
बोगस शिक्षक भरती व गांजा प्रकरणाचे विस्फोटक खुलासे
गोटे यांनी शेवटी म्हटले आहे की, “दुसऱ्या पत्रात बोगस शिक्षक भरती व गांजा प्रकरणातील आमदारांचा सहभाग यावर मी खुलं पत्र लिहिणार आहे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
टीप: ही बातमी पूर्णपणे माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारित असून, त्यांच्या आरोपांची चौकशी व सत्यता संबंधित अधिकृत यंत्रणांकडून होणे अपेक्षित आहे.



