धुळे दर्पण न्यूज :- पुण्यातील प्रतिष्ठित ए. के. इन्स्टिट्यूटच्या पुना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये कॉलेज एक्झामिनेशन ऑफिसर (सीईओ) आणि संशोधन मार्गदर्शक डॉ. सैय्यद वकील यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य सोहळा आणि उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

  या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. इक्बाल शेख, प्रभारी रजिट्रार ॲडव्होकेट इस्माईल सय्यद, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शिरीन शेख, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. नसरीन खान, पुस्तक सह-लेखक डॉ. सैय्यद वकील व कॉमर्स विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


🔹 प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन:

📘 १) ‘फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन:

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) FYBCOM अभ्यासक्रमासाठी हिमालय पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोलाचे ठरणार आहे.


🌐 २) डॉ. वकील यांच्या जागतिक ब्लॉगचा शुभारंभ:

  https://vakeelsir.blogspot.com या ब्लॉगचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी कौशल्य वाढवणाऱ्या लेखांमुळे हा ब्लॉग अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचला असून ८५ देशांमधील वाचक त्याचा लाभ घेत आहेत.
  यामध्ये जर्मनी, अमेरिका, सिंगापूर, यूएई, तुर्की, सौदी अरेबिया, आयर्लंड, यूके, हाँगकाँग, रशिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, फ्रान्स, मेक्सिको आणि युक्रेन यांसारख्या देशांचा समावेश आहे.


📲 ३) डॉ. वकील इंग्लिश क्लबचे उद्घाटन:

  विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा कौशल्य वाढीसाठी ‘डॉ. वकील इंग्लिश क्लब’ या व्हॉट्सअ‍ॅप कम्युनिटीचे उद्घाटन करण्यात आले.
  विशेषत: उर्दू, हिंदी, मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा आत्मविश्वासाने बोलता यावी, या हेतूने हा क्लब सुरू करण्यात आला आहे.
क्लबमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक:
👇👇


❤️ ४) सामाजिक बांधिलकी उपक्रम – अनाथ बालकाला मदत:

  कॉलेजमधील सामाजिक बांधिलकी जपत सीईओ डॉ. सैय्यद वकील यांनी वाय अँड एम एकेआय ट्रस्टचे, मुंबईमार्फत एका अनाथ मुलाचे पालकत्व घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी कौतुक केले.


- Advertisement -

🌟 कार्यक्रमाची सांगता:

  कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. इक्बाल शेख यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे व शिक्षकवृंदाचे आभार मानले. वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेले शैक्षणिक व सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com


– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -