धुळे दर्पण न्यूज :- कैलासनगर, चितोड रोड लगत असलेल्या ओपन स्पेसमध्ये उभ्या राहणाऱ्या मुक्तेश्वर महादेव धाम या भव्य मंदिराची निर्मिती अंतिम टप्प्यात असून, या पवित्र स्थळाचा शिलान्यास सोहळा श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या ऐतिहासिक क्षणी धुळे शहराचे लोकप्रिय आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या हस्ते भगवान शंकराच्या पूर्णाकृती मूर्तीच्या चबुतऱ्याचे भूमीपूजन झाले.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या धार्मिक प्रकल्पाची संकल्पना ‘खान्देश मैदान’चे संपादक व धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. मनोजभाऊ गर्दे यांची असून, त्यांच्याच माध्यमातून हे पुण्यकार्य सिद्धीस येत आहे. अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
आमदार अनुपभैय्यांचा आशीर्वादमय संदेश :
“भगवान भोलेनाथाच्या कृपेनेच आज या भूमीपूजन सोहळ्यात मला सहभागी होता आले. मनोजभाऊ गर्दे यांच्या हृदयातील श्रद्धा आणि सेवाभाव या मंदिराच्या निर्मितीमुळे साकार झाला आहे. भगवान शंकर त्यांच्या कुटुंबाला सुख, समृद्धी, आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो,” असे उद्गार आमदार अनुपभैय्यांनी यावेळी काढले.
त्याचप्रमाणे, आमदार म्हणाले, “या परिसरात धार्मिक जागा उभारली जात असल्याने मिल परिसरास नवसंजीवनी लाभेल. धुळे शहराच्या धार्मिक वैभवात ही भर आहे.”
भाजप शहर जिल्हाध्यक्ष अंपळकरांचा आशावाद :
भूमीपूजनानंतर भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर म्हणाले, “या धामाची निर्मिती ही एक दिव्य प्रेरणा आहे. याच भूमीपूजन कार्यक्रमात अनुपभैय्या आमदार नव्हते. मात्र, भगवान भोलेनाथाच्या कृपेने ते आज आमदार झाले आहेत. उद्या हेच अनुपभैय्या मंत्री म्हणून शपथ घेतील, यावर आमचा ठाम विश्वास आहे.”
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती :
या सोहळ्यात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते हिरामण आप्पा गवळी, सरचिटणीस चेतन मंडोरे, पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे, माजी नगरसेविका सुरेखा उगले, तसेच शशीकांत मोगलाईकर, आकाश परदेशी, पंकज धात्रक, सुहास अंपळकर, निलेश नेमाणे, किशोर सरगर, मणिबाबा खैरनार, बंटीबाबा, आदी प्रमुख कार्यकर्ते व सामाजिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
मनोजभाऊ गर्देंचा भावनिक संदेश :
मुक्तेश्वर धाम संकल्पक मनोजभाऊ गर्दे म्हणाले, “इतक्या भव्यतेने मंदिर साकारले जाईल, याचा आम्ही विचारही केला नव्हता. ही केवळ माझी संकल्पना नाही तर भगवान शंकराची कृपा आहे. अनुपभैय्यांना आम्ही आमदार होण्यापूर्वीच आमंत्रित केले होते, आणि आज ते आमदार म्हणून उपस्थित राहिले. उद्या ते मंत्री म्हणूनही याच पवित्र भूमीत पुन्हा येतील असा आमचा विश्वास आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश गाळणकर यांनी केले आणि उपस्थित मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे, भक्तांचे आणि परिसरातील नागरिकांचे मनोज गर्दे यांनी आभार मानले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
धुळेकर भक्तांसाठी एक नवे श्रद्धास्थान उभे राहत असून, भगवान शंकराच्या आशीर्वादाने शहरात धार्मिक चेतना आणि एकात्मता अधिक बळकट होईल यात शंका नाही. ‘धुळे दर्पण’ कडून मनोजभाऊ गर्देंना आणि सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा!
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



.jpg)