धुळे दर्पण न्यूज :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त २५ जुलै रोजी धुळे शहरात दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल, धुळे शहर यांच्या वतीने परिवर्तन विद्यालय, क्रांती चौक, चितोड रोड, धुळे येथे पार पडला.
  या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.ना. सुनील तटकरे साहेब, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणजी आखाडे साहेब यांच्या आदेशाने तसेच प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे शहराध्यक्ष कैलास भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शिबिर पार पडले.
- Advertisement -

  कार्यक्रमाची संकल्पना ओबीसी सेलचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ माळी यांची होती.

  या शिबिरात विद्यार्थ्यांना दातांची निगा कशी राखावी, दातांचे आरोग्य आणि आजारांचे प्रतिबंधक उपाय यावर डॉ. पराग तारगे, डॉ. हितेश तलरेजा आणि डॉ. रोहित टेकवाणी यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणीही करण्यात आली.

  कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे प्राचार्य पाटील सर, ओबीसी सेल शहराध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, कुंदन पवार, शहर उपाध्यक्ष दशरथ भाऊ शिंदे, अतुल अहिरराव यांनी प्रतिमा पूजन करून उद्घाटन केले.

  प्रमुख मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ज्ञानेश्वर माळी, माजी नगरसेवक उमेश भाऊ महाले, निखिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

  या शिबिराला उपस्थित मान्यवर –
कैलास भाऊ चौधरी (शहराध्यक्ष), जया ताई साळुंखे (महिला शहराध्यक्ष), ज्ञानेश्वर माळी (ओबीसी सेल अध्यक्ष), कुंदन पवार, उपाध्यक्ष दशरथ भाऊ शिंदे, अतुल अहिरराव, विजय पाटील, अरुण वाकडे, उमेश महाले, निखिल पाटील, संतोष केदार, संजय मामा अहिरे, रईसभाई काजी, शाळेचे प्राचार्य पाटील सर, डॉ. पराग तारगे, डॉ. रोहित टेकवाणी, डॉ. हितेश तलरेजा, ज्ञानेश्वर मिस्त्री, क्षगुप्ता मॅडम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  हा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून पालक व शिक्षकांनीही उपक्रमाचे कौतुक केले.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -