शिंदखेडा तालुक्यातील एका खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनानिमित्त कृषिमंत्री कोकाटे धुळे दौऱ्यावर आले होते. मागील काही दिवसांपासून कृषिमंत्री कोकाटे हे ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होऊन चर्चेत आले होते. तसेच शेतकऱ्यांविषयी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे ते सतत वादाच्या भोवऱ्यात आहेत.
🔥 दौऱ्याच्या आधीपासूनच भीतीची सावली
मालेगावहून धुळ्यात दाखल होण्यापूर्वीच कृषिमंत्र्यांना शिवसैनिकांच्या विरोधाची भीती वाटू लागली. त्यामुळे त्यांनी नियोजित मार्ग बदलत चोरमार्गाने धुळ्यातील रेसिडेन्सी पार्क हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, पत्रकार व चॅनल प्रतिनिधींना या हालचालींची माहिती मिळाल्यावर त्यांनी तेथेच गर्दी केली. कृषिमंत्र्यांनी संवाद टाळत अवघ्या काही मिनिटांत हे हॉटेल सोडले व पुन्हा मार्ग बदलून टॉप लाईन हॉटेलमध्ये थांबले.
![]() |
| - Advertisement - |
रात्री उशिरा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व काही व्यापाऱ्यांनी कृषिमंत्र्यांना दिलासा दिला. मात्र सकाळी २५ जुलै रोजी शिवसेना उबाठा पक्षाच्या जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी टॉप लाईन हॉटेलबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
🔥 आंदोलनाच्या घोषणांनी परिसर दणाणला
“मंत्र्यांचा राजीनामा घ्या”, “महाराष्ट्राच्या पवित्र विधिमंडळाला जुगाराचा अड्डा बनवणाऱ्या कृषी मंत्राचा धिक्कार असो”, “कृषी मंत्राची पोरगी काय म्हणते, शेतकरी नवरा नाय म्हणते” अशा घोषणा देत शिवसैनिकांनी दोन तासांहून अधिक काळ हॉटेलला घेराव घातला.
धुळे जिल्ह्यातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात असताना, डीएपी व युरियाच्या तुटवड्याने त्रस्त असताना, कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला वेळ देत आहेत, या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्तेही सहभागी झाले.
🔥 पोलिसांचा गोंधळ व ताफ्याची लपवाछपवी
पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असला, तरी कृषिमंत्र्यांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. अखेर पोलिसांनी रणनीती बदलून कृषिमंत्र्यांचा ताफा हॉटेलच्या मागच्या गेटमधून बाहेर काढत, गोंदूर मार्गे शिंदखेड्याकडे नेला. मात्र, सोनगीरजवळ शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत पुन्हा घोषणाबाजी केली.
![]() |
| - Advertisement - |
शेवटी प्रचंड तणावाखाली कृषिमंत्र्यांनी पेट्रोल पंपाचे उद्घाटन घाईघाईने उरकले. उद्घाटनावेळी एका माजी आमदाराने कृषिमंत्र्यांची स्तुती करत “हेच भावी मुख्यमंत्री” असल्याची मुक्ताफळे उधळली.
🔥 नंतरचा दौरा बदलला
प्रथम जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात जाण्याचे ठरले होते. मात्र शिवसैनिकांच्या आंदोलनाची भीती वाटल्याने कृषिमंत्र्यांनी थेट नंदुरबार जिल्ह्यात जाण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा तेथे पोचल्यावर काहीसा दिलासा मिळाला.
🔥 आंदोलनात सहभागी शिवसैनिकांची नावे
या आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाणे, निंबा मराठे, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, हेमराज पाटील, गजेंद्र पाटील, अण्णा फुलपगारे, आनंद जावडेकर, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, पंकज भारस्कर, सागर निकम, पिंटू ठाकूर, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, विष्णू जावडेकर, गोकुळ बडगुजर, वैभव पाटील, केतन भामरे, गुलाब देवरे, मनोज पाटील कुंडाणे, अमोल पाटील, विजय चौधरी, शांताराम माळी, ईश्वर मराठे, सावता माळी, महादेव आदींचा सहभाग होता.



