धुळे दर्पण न्यूज :- शहरातील गांधी पुतळा रोड ते नगरपट्टी या प्रमुख मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रस्त्याच्या उखडलेल्या आणि खड्ड्यांनी भरलेल्या अवस्थेमुळे अपघाताच्या घटनाही वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर माजी महापौर तथा भाजप नेते चंद्रकांत सोनार यांनी सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  या कामासाठी त्यांनी महाराष्ट्राचे पालकमंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे तसेच आमदार अनुप दादा अग्रवाल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या सहकार्याने या रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर रस्त्याचे काम सुदृढ आणि टिकाऊ काँक्रीट पद्धतीने करण्यात येत असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात देखील करण्यात आली आहे.

- Advertisement -

  रस्त्याच्या कामाची सुरूवात झाल्यानंतर देखील काही राजकीय पक्षांनी आंदोलनाचा अवलंब करत असल्याचे दिसून आले. याबाबत प्रतिक्रिया देताना माजी महापौर चंद्रकांत सोनार यांनी स्पष्ट केले की, संबंधित रस्त्याचे काम पूर्वीच मंजूर झाले असून प्रत्यक्षात काम सुरू देखील झाले आहे. उशिरा आंदोलन उभारणे ही निव्वळ दिखावूपणाची भूमिका असून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

  या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पप्पूभाई डापसे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांत सोनार यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण लवकरच पूर्ण होऊन धुळेकरांना एक मजबूत आणि सुरक्षित रस्ता मिळणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  नागरिकांमध्येही या विकासकामाबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्याच्या सुधारित अवस्थेमुळे वाहतूक सुरळीत होणार असून परिसराचा सर्वांगीण विकासास हातभार लागणार आहे.

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -