धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅंप) सन 2025-26 अंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील मौजे दलवाडे येथे एक भव्य व प्रभावी शेतकरी शेतीशाळा नुकतीच पार पडली. या शेतीशाळेत गावातील शेकडो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा. श्री. सुरज जगताप, तालुका कृषी अधिकारी मा. श्री. देवेंद्र नागरे, सेंद्रिय कृषी भूषण श्री. दिलीप पाटील यांच्यासह कृषी विभागातील अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व शेतकऱ्यांच्या सहभागातून **‘कृषी दिंडी’**ने झाली. दिंडीमधून शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यात आली.
![]() |
| - Advertisement - |
यानंतर प्रगतिशील शेतकरी महेंद्रसिंग गिरासे यांच्या शेतावर मुख्य शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सुरज जगताप यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या चालू व नविन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली आणि त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने वृक्षलागवडीचा उपक्रमही घेण्यात आला. त्यास कृषी विभागातील मान्यवरांनी सहभाग दिला.
वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाचा सत्कार सहायक कृषी अधिकारी श्री. महेद्र भदाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमाकांत सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्री. दीपक झाल्टे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागातील उपकृषी अधिकारी श्री. भरत अहिरराव, श्री. जीवन पिंपळे, श्री. कपिल चौधरी, श्री. जयेश देसले, श्री. अरविंद पवार, श्री. महेंद्र भदाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
ही शेतीशाळा केवळ माहितीपर उपक्रम न राहता शेतकऱ्यांना आधुनिक, वैज्ञानिक व सेंद्रिय शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करणारा प्रभावी प्रयत्न ठरला. अशा उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत असून, शासनाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |



