धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील पारोळा रोडवर जुलै २०१७ मध्ये झालेल्या कुख्यात गुंड गुड्ड्या उर्फ रफियोद्दीन शेख यांच्या खून प्रकरणातील दोन संशयितांना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मात्र, हा जामीन अटी-शर्तींसह देण्यात आला असून, या दोघांना खटल्याशी संबंधित तारखांशिवाय धुळे शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

  या खून प्रकरणामुळे त्या काळात शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. गुड्ड्या शेखचा खून हा वर्चस्वाच्या वादातून झाल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी बडा पापा उर्फ विजय श्यामराव गोयर, विक्की उर्फ बाबा श्यामराव गोयर (दोघे रा. रामदेव बाबा नगर, वडजाई रोड, धुळे) तसेच अन्य संशयित अशा एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या सर्वांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

- Advertisement -

  दरम्यान, सर्व संशयित आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. विशेष म्हणजे, या प्रकरणातील दोन महत्वाच्या संशयित आरोपी विजय गोयर व विक्रम गोयर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर सुनावणी करताना खंडपीठाने प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला.

  मात्र, या जामिनासोबतच न्यायालयाने कठोर अटी-शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार, विजय गोयर व विक्रम गोयर यांनी फक्त खटल्याच्या तारखांना हजर राहण्यासाठीच धुळे शहरात प्रवेश करावा, अन्य वेळेस शहरात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, शहरात यायचे असल्यास जिल्हा न्यायाधीशांच्या सत्र परवानगी घ्यावी लागणार आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  या प्रकरणातील पुढील सुनावणी येत्या काही दिवसांत होणार असून, गुन्ह्यातील इतर आरोपींच्या जामिनावरही न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान, या प्रकरणावर शहरवासीयांसह पोलिस प्रशासनाकडूनही लक्ष ठेवण्यात येत आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -