धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्रातील विविध शासकीय, निमशासकीय विभागांतील कामगार व कर्मचारी संघटनांनी ९ जुलै रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला असून, यामध्ये मोर्चा काढणे तसेच भोजन काळात निदर्शने करण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  राज्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने निवडून दिले असले, तरी सत्तेवर येऊन सुमारे सहा महिने उलटले तरीही मागील शासनाने दिलेल्या अनेक आश्वासनांवर ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे कर्मचारी, शिक्षक, आणि विविध विभागातील कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

  कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती योजना (NRPS) लागू करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. मात्र, त्याबाबत आजतागायत कोणतीही विस्तृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. त्याशिवाय PF RDA कायदा रद्द करणे, शिक्षण व आरोग्य विभागातील प्रश्न, वेतन त्रुटी दूर करणे, प्रलंबित महागाई भत्ता, रिक्त पदांची भरती, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या, वयोमर्यादा ६० वर्षे करणे, चतुर्थ श्रेणी व वाहन चालकांची भरती, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० सेवा प्रगती योजना लागू करणे, आठवा वेतन आयोग लागू करणे या आणि अशा अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  तसेच, IPC कलम ३५३ हे अजामीनपात्र करणे, चार नवीन कामगार कायदे संहितांचा रद्दबातल करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करणे, तसेच १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त करणारा संच मान्यता आदेश तात्काळ रद्द करणे या मागण्यांसोबतच इतर वित्तीय व सेवाविषयक मागण्यांकडे शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही, ही बाब चिंताजनक असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

  या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर, रोजंदारी, अंशकालीन व ठेका पद्धतीवरील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे. ९ जुलै रोजी जिल्हा स्तरावर मोर्चा आणि कार्यालयीन वेळेत भोजन काळात निदर्शने करण्यात येणार असून, आवश्यक तीव्र पावले उचलण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

- Advertisement -

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -