धुळे दर्पण न्यूज :- मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार शोभाताई बच्छाव यांच्या पुढाकाराने मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

  शहराच्या विकासातला प्रमुख अडथळा ठरणाऱ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन तातडीने निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. यामध्ये नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागेची तात्काळ निवड करण्यावर विशेष भर देण्यात आला, जेणेकरून शहरातील रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकेल.

  याशिवाय, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. शहरातील स्वच्छतेसंदर्भातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ठरविण्यात आल्या.

- Advertisement -

  अमृत-२ योजनेअंतर्गत चालू असलेल्या आणि नियोजित पाणीपुरवठा तसेच ड्रेनेजच्या कामांचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. कामांतील अडचणी दूर करून त्यांना गती देण्याचे ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

  खासदार निधीतून मालेगाव शहरातील नागरीकांसाठी सिटी लायब्ररी व वाचनालय उभारण्यासाठी जागा निश्चित करण्याबाबतही चर्चा झाली. ज्ञानप्रेमींना आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

  केंद्र शासनाच्या निधीतून पूर्णत्वास गेलेल्या कामांचे लवकरच उद्घाटन करण्यासह नवीन योजनांचे भूमिपूजन देखील तत्परतेने करण्याचे ठरले. त्यामुळे नागरिकांना या योजनांचा थेट लाभ लवकरच मिळणार आहे.

  मागील तीन वर्षांत केंद्र, राज्य व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पंतप्रधान आवास योजना, दलित वस्ती सुधारणा, अल्पसंख्याक विकास निधी या योजनांच्या प्रगतीचीही सखोल समीक्षा करण्यात आली.

  या बैठकीनंतर बोलताना खासदार शोभाताई बच्छाव यांनी सांगितले की, “मालेगावच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या बैठकांचा नियमित आयोजन करण्यात येईल, जेणेकरून नागरिकांच्या गरजा वेळेत पूर्ण करता येतील.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

  मालेगाव शहराच्या प्रलंबित प्रकल्पांना गती मिळावी आणि विकास कामांना दिशा मिळावी, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता. आगामी काळात या निर्णयांची अंमलबजावणी होऊन शहराच्या विकासाला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -