धुळे दर्पण न्यूज :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरातील जनतेसाठी मोठा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमदार अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून एबी फाउंडेशन व महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत चितोड रोडवरील महापालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिर होणार आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या शिबिराचे उद्घाटन राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनूप अग्रवाल आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार राम भदाणे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, प्रांताधिकारी रोहन कुवर, तसेच मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील उपस्थित राहणार आहेत.
![]() |
| - Advertisement - |
विशेष म्हणजे, या शिबिरासाठी प्रभागाच्या माजी नगरसेविका माधवी नेमाने यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या उपक्रमामध्ये शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, गरजूंनी आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने नीलेश नेमाने आणि कमलेश देवरे यांनी केले आहे.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
शहरातील नागरिकांचे आरोग्य जपणे व रक्तदानासारख्या पुण्य कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमातून सामाजिक जाणीव वाढवण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराला हजेरी लावून आरोग्य तपासणी करावी व गरजूंसाठी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


