धुळे दर्पण न्यूज :- गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगल पर्वानिमित्त देवपुरातील विद्यानगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रावर ए.बी. फाऊंडेशनच्या वतीने मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या शिबिरात सर्व वयोगटातील शेकडो रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना औषधे मोफत देण्यात आली तसेच पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, दात, नेत्र तपासणी आदींचा समावेश असलेल्या या शिबिरामुळे नागरिकांना आरोग्याची सविस्तर माहिती मिळाली आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढली.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सौ. अल्पाभाभी अनुपभैय्या अग्रवाल, श्री. महादेवभैय्या परदेशी, सौ. मायादेवी परदेशी, तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मान्यवरांनी ए.बी. फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावाचे मनःपूर्वक कौतुक केले. गुरुपौर्णिमा ही श्रद्धा, सेवा व गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असून, या दिवशी राबवलेले आरोग्य शिबिर समाजाच्या हितासाठी महत्त्वाचे ठरल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या आयोजनात ए.बी. फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक तसेच आरोग्य तज्ज्ञांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. शिबिराच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी आपली मोफत तपासणी करून घेतली आणि आरोग्याविषयी उपयुक्त माहिती मिळवली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या आरोग्य शिबिराच्या निमित्ताने गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ – सेवा, समर्पण व समाजाप्रती जबाबदारी – पुन्हा एकदा साकार झाल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले. ए.बी. फाऊंडेशनच्या वतीने पुढील काळात असेच उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.


