धुळे दर्पण न्यूज :- शहरातील साक्री रोडवरील आयकर भवन ते पत्रकार भवन आणि नर्सेस कॉर्टर या परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. विशेषतः सुरतकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या ट्रॅव्हल्समुळे रात्री नऊनंतर आणि सायंकाळी सातनंतर या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. या वेळी महिलांसाठी प्रसाधनगृहाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेलाच मोठ्या धास्तीने आपला नैसर्गिक विधी उरकत होत्या. या परिसरात दत्त मंदिराकडे जाणारी वर्दळ देखील दहापर्यंत सुरू राहते, त्यामुळे महिलांना हा अनुभव अत्यंत अपमानास्पद आणि नकोसा वाटत होता.

  या समस्येची दखल घेत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सतत पाठपुरावा करत महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी चर्चा केली. विशेष म्हणजे नर्सेस कॉर्टरलगत असलेल्या मोकळ्या जागेत महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड तयार केले होते. त्यामुळे त्या जागेत मातीचे ढिगारे, काटेरी झाडे आणि प्रचंड प्रमाणात कचरा साचला होता. अशा अवस्थेत महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ ठिकाणच उपलब्ध नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर झाला होता.

- Advertisement -

  या समस्येच्या समाधानासाठी धीरज पाटील यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, वसावे सो, किशोर मोरे सो आणि रवी धुमाळ सो यांच्याशी सातत्याने संपर्क साधला. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि मनपाच्या जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली. तसेच, विद्युत वितरण कंपनीच्या डीपीभोवती वाढलेली काटेरी झाडे शहर अभियंत्यांच्या सहकार्याने अर्धा तास वीजपुरवठा खंडित करून हटवण्यात आली.

  या कामामुळे आता त्या ठिकाणी प्रवासी महिलांना रात्रीच्या वेळी थांबताना प्रसाधनगृहासाठी जागा वापरता येईल, ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुसह्य होईल. शिवाय पत्रकार भवन ते दत्त मंदिर पर्यंतचा रस्तादेखील लवकरच दोन्ही बाजूंनी साफ करण्यात येणार आहे.

  विशेष म्हणजे हे काम छोटं असलं तरी गेल्या पंधरा दिवसांपासून मनपाच्या जेसीबी उपलब्ध न झाल्याने, आणि कामगारांच्या मर्यादांमुळे ते रखडत होतं. मात्र शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर हे काम पूर्ण झाले.

  “फक्त आंदोलन करून जनतेच्या समस्या दाखवणे हा आमचा हेतू नाही, तर सत्ता नसतानाही योग्य ते प्रयत्न करून त्या सोडवणे हेच आमचं खरं समाजकारण आहे. यात राजकारण नाही, फक्त जनतेसाठी निस्वार्थ सेवा,” असे शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सांगितले.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."


धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -