धुळे दर्पण न्यूज :- महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या इतिहासात एक आगळीवेगळी आणि अभूतपूर्व घडामोड घडली – धुळे जिल्ह्यातील प्रगतशील सेंद्रिय शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील कृषी विभागातील सेवानिवृत्त व कार्यरत अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान व सत्कार सोहळा आयोजित केला. हा सोहळा चांडक सेंद्रिय फार्म येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सेवा निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री अनिलजी भोकरे यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले, "आज आम्हाला जो सन्मान दिला गेला आहे, तो केवळ आमच्यासाठी नाही, तर हा शेतकऱ्यांच्या विश्वासाचा सन्मान आहे. सेवा संपली असली तरी शेतकरी हा आमचा श्वास आहे. पुढेही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."
सन्मान व सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेंद्रिय शेतकरी सुधाकर दादा बेंद्रे होते. व्यासपीठावर प्रकल्प संचालक आत्मा धुळे श्री हितेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम श्री आरिफ शाह, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री दिनेश नांद्रे, प्रा. पंकज पाटील, कृषी विकास अधिकारी श्री सिताराम चौधरी, कृषी भूषण सेंद्रिय शेतीचे श्री इलियास भाई कुरेशी, शाश्वत सेंद्रिय शेतकरी अशोक भाई शहा, आनंदराव पाटील, श्री भास्कर गव्हाणे (समृद्धी ऑरगॅनिक पुणे), नितीन वारके (सर्ग विकास समिती, धुळे), जय भूमी ऍग्रोचे अविनाश पाटील, सेंद्रिय कृषी भूषण श्री दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
![]() |
| - Advertisement - |
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेंद्रिय कृषी भूषण व गो संजीवन संस्थेचे संस्थापक श्री दिलीप पाटील यांनी केले. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या धुळे पॅटर्नची वाटचाल, शेतकऱ्यांचा उत्साह आणि या क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या योगदानाची सखोल माहिती दिली.
🔹 कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव
या सोहळ्यात सेंद्रिय शेतीच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री पी एम सोनवणे, श्री अनिल भोकरे, श्री विनय बोरसे, श्री अमृत पवार, श्री महेंद्र वारुळे, श्री कैलास देवरे, श्री सतीश पाटील आदींचा विशेष सन्मान करण्यात आला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम श्री आरिफ शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "माजी कृषी सचिव व आयुक्त सुधीर कुमार गोयल आणि विभागीय कृषी सह संचालक आर. एच. पाटील साहेब यांनी धुळ्यावर जे प्रेम दाखवले, त्यामुळेच सेंद्रिय शेतीची चळवळ इथे यशस्वी झाली. आता वाशिम जिल्ह्यात देखील जलतारा प्रकल्प आणि चिया सीड्स लागवडमुळे शेतकऱ्यांचे नाव देशात आणि परदेशात पोहोचले आहे, आणि हे शक्य झाले ते अशा प्रेरणादायी अधिकाऱ्यांच्या योगदानामुळे."
🔹 कार्यक्रमातील विशेष मनोगते आणि आयोजन
या कार्यक्रमात अध्यक्ष सुधाकर दादा बेंद्रे, कृषी विकास अधिकारी सिताराम चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. दिनेश नांद्रे, सेवा निवृत्त कृषी विकास अधिकारी पी एम सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक श्री प्रवीण पवार व वाल्मिक सोनावणे यांनी केले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
🔹 अभूतपूर्व यशासाठी शेतकरी संघटनांचा सहभाग
या सोहळ्याच्या यशामध्ये चांडक सेंद्रिय फार्मचे संचालक विजय चांडक, उद्यान पंडित विलास माळी, कृषी भूषण दिलीप पाटील, जय भूमीचे अविनाश पाटील, मधुकर पाटील, डॉ. धनंजय नेवाडकर, वाल्मीक पाटील, संजू महाराज, शशिकांत भदाणे, सुनील पाटील, वसंतराव साळुंखे, प्रकाश पाटील, गोपीचंद पाटील, सुदाम करंके, समृद्धी ऑरगॅनिकचे प्रशांत मोराणकर, सर्ग विकास समितीचे राजेश तिवारी, सुजित काटे, प्रवीण सोनवणे, सतीश शिंदे, कृषी पदवीधर संघाचे सागर चिमटे, कोमल माळी, पंकज महाजन आदींनी परिश्रम घेऊन मोलाचे योगदान दिले.
धुळे दर्पणमुख्य संपादक : सैय्यद सानिल(B.Com, M.Com, M.A.MCJ)📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


