धुळे दर्पण न्यूज :- देशभरातील सुमारे ८० लाख सरकारी कर्मचारी व शिक्षक वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक फरीदाबाद (दिल्ली) येथे १६ व १७ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडली. या महत्त्वपूर्ण बैठकीस महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. सुभाष लांबा यांच्या अध्यक्षतेखाली महासचिव श्री. एस. श्रीकुमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. विश्वास काटकर, श्री. उमेशचंद्र चिलबुले, श्री. अशोक दगडे, डॉ. संजय पाटील, श्री. सुरेंद्र सरतापे, श्री. सुधाकर सुर्वे, श्री. प्रशांत जामोदे, श्रीमती कविता ठोंबरे यांच्यासह देशभरातील विविध राज्यांतून मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
या बैठकीत संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. संजय दगडुजी पाटील यांनी महाराष्ट्रातील कर्मचारी वर्गाच्या समस्या मांडताना राज्य शासनावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, सुधारीत राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) लागू करण्याचा शासन निर्णय काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना व राजपत्र अद्याप राज्य सरकारकडून प्रसिद्ध केलेले नाहीत. "राज्य सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करीत असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व असंतोष वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर शिक्षक व कर्मचारी वर्ग पुन्हा बेमुदत संपाच्या मार्गावर जाण्याचा दबाव वाढत आहे," असे डॉ. पाटील म्हणाले.
![]() |
| - Advertisement - |
बैठकीत पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांत कार्यरत असलेल्या युवकांच्या शोषणाचा मुद्दा उपस्थित केला. फक्त ८००० रुपये मासिक मानधनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जात असून, ही बाब गंभीर अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने सुरू असलेली भरती तातडीने थांबवावी व विद्यमान कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्यासाठी संघटना सातत्याने लढा देत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, देशभरात आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर विविध खातेनिहाय संघटनांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर व्यापक बैठक घेण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
बैठकीच्या शेवटी ठराव घेऊन, येणाऱ्या काळात कर्मचारी वर्गाच्या हक्कांच्या लढ्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे तीव्र पाठपुरावा करण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


