एकाला अटक; शिरपूर पोलिसांची कारवाई
धुळे दर्पण न्यूज :- शिरपूर तालुक्यातील दहिवद परिसरात जुन्या भांडणातून एका युवकाचा बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २०) उघडकीस आली. विनायक उर्फ बारकु काशिनाथ पाटील (वय ३७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:
विनायक पाटील हा बुधवारी दुपारी मानवरोहणी केंद्राजवळील शेताकडे जात असताना रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला खाजगी रुग्णवाहिकेतून शिरपूर येथील खासगी रुग्णालयात हलवले; परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
![]() |
| - Advertisement - |
मृत विनायक पाटील याचा चुलत भाऊ चुनिलाल जगन्नाथ पाटील याने पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, पूर्ववैमनस्यातून दहिवद गावातीलच उमेश उर्फ दादु विश्वनाथ चव्हाण याने विनायक पाटील याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनायकचा मृत्यू झाला.
शिरपूर पोलिसांनी तक्रार दाखल करताच उमेश चव्हाण याला तातडीने अटक केली. या कारवाईत पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोसई सुनिल वसावे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
या घटनेने दहिवद परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास शिरपूर पोलिसांकडून सुरू आहे.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


