धुळे दर्पण न्यूज :- गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असतानाही धुळे महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम अद्यापही वेगाने सुरू केलेले नाही. पारोळा रोड, बारापत्थर व वाडीभोकर रस्त्यासह अनेक प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याशिवाय काही रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामामुळे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवात वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

कोंडीत भर काँक्रिटीकरणाची

  महात्मा गांधी चौकापासून सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता तसेच गल्ली क्रमांक सहा येथे सध्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक बंद असून, पर्यायी मार्ग म्हणून गल्ली क्रमांक पाच, पारोळा रोड व आग्रा रोडवर वाहतूक वळवण्यात आली आहे. दुसरीकडे बारापत्थर रस्त्यावरील उर्वरित कामामुळे हा रस्ताही काही ठिकाणी बंद आहे. हे सर्व कामे दीड महिन्यांपासून सुरू असून अद्याप पूर्णत्वाला आलेले नाहीत.

- Advertisement -

खड्ड्यांचा त्रास कायम

  पारोळा रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते सहावी गल्ली चौकापर्यंत वाहनचालकांना अक्षरशः खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. खुले नगरपट्टी रस्ता, बारापत्थर रस्ता आणि जे.बी. रोडवरील वाहतूकही या कामांमुळे विस्कळीत झाली आहे.


मनपाचे आश्वासन

  याबाबत महापालिकेचे उपअभियंता चंद्रकांत उगले यांनी सांगितले की, “शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये खडी टाकून त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. पारोळा रोडवर खोदण्यात आलेल्या चारी बुजवण्याचे काम सुरू आहे. तसेच काँक्रिटीकरण पूर्ण झालेले रस्ते लवकरच वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील.”

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

वाहतूक सुरळीत होणार का?

  गणेशोत्सवापूर्वी हे सर्व रस्ते दुरुस्त व खुले केले नाहीत तर उत्सवाच्या काळात शहरात वाहतुकीची कोंडी अटळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करणे गरजेचे आहे.

धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -