बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय श्री. श्याम भाऊ सनेर, माननीय श्री. सुनील तात्या नेरकर यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान पक्ष संघटन बळकटीकरण, आगामी निवडणुकीची रणनीती, युवकांचा सहभाग, तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
![]() |
| - Advertisement - |
डॉ. फारुख शहा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही विचारसरणीला बांधील असलेली पक्षसंस्था आहे. पक्षाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, विकास आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम आपण सर्वांनी एकत्रितपणे करायचे आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपले कार्य समाजाशी जोडले गेले पाहिजे.”
"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."
बैठकीत धुळे शहरातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर, शहर विकास आराखडा, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पाणीटंचाई, बेरोजगारी यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. तसेच पक्षाच्या युवक शाखेला बळकट करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा ठरावही या बैठकीत घेण्यात आला.
कार्यकर्त्यांनी या बैठकीत पक्षाविषयी निष्ठा व उत्साह व्यक्त केला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरात जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A.MCJ)
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com
– धुळे दर्पण –
(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)
(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)
तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम
![]() |
| - Advertisement - |


