धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील कल्याण भवन येथे माजी आमदार अनिल गोटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे नेते व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोपांचा पाऊस केला. “महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात इतके भ्रष्ट, चारित्र्यहीन आणि धंदेवाईक राजकारणी बसले आहेत की, हे मंत्री नसून जणू ‘नमुने’ आहेत,” अशी टीका करत गोटे यांनी रावल यांच्यावरील १४ भानगडींची विस्तृत यादी जनतेसमोर ठेवली.



भ्रष्टाचाराने ग्रासलेले सरकार” – गोटे

  पत्रकार परिषदेत बोलताना गोटे म्हणाले,
  “महाराष्ट्राचे सध्याचे मंत्रिमंडळ हे गेल्या ७५-८० वर्षांतील सर्वात भ्रष्ट आहे. ज्यांची जागा तुरुंगात आहे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे, हे महाराष्ट्राच्या लोकशाहीचे दुर्दैव आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे भ्रष्टाचाराचे कंठमणी आहेत. त्यांच्या चौदा भानगडी ही त्याची पुरावा आहेत.”
- Advertisement -


१४ भानगडींचा तपशील

  गोटे यांनी मांडलेल्या काही प्रमुख आरोपांमध्ये –

  • रावल बँक घोटाळा – १६८ ठिकाणी भ्रष्टाचार सिद्ध झालेला असतानाही गेल्या दहा वर्षांत प्रकरण लांबणीवर टाकल्याचा आरोप.
  • शेवाडी व बह्याणे धरण प्रकल्प घोटाळे – बुडीत क्षेत्रात न येणाऱ्या जमिनी दाखवून शेकडो कोटींचा अपहार केल्याचा आरोप.
  • तोरणमाळ रिसॉर्ट प्रकरण – एमटीडीसीची जागा परस्पर वापरून बेकायदेशीर कारभार, अधिकाऱ्यांवर हल्ल्याचा आरोप.
  • सारंगखेडा व बॉम्बे फेस्टिवल घोटाळे – खोट्या कंत्राटांद्वारे तब्बल ७५ कोटींचा अपहार, अधिकाऱ्यांच्या चौकशीला अडथळे आणल्याचा आरोप.
  • आदिवासींच्या जमिनींची बेकायदेशीर विक्री, युनिव्हर्सल स्टार्च कंपनीतून मार्केट फी हडप, विठ्ठल सहकारी पाणी पुरवठा संस्थेचा गैरवापर, महामहीम राष्ट्रपतींच्या जमिनीचे प्रकरण, अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे.

  गोटे म्हणाले की, “रावल कुटुंबाने सरकारी प्रकल्पांचा वापर करून शासनाची तिजोरी लुटली. जनतेच्या नावाखाली करोडोंची संपत्ती हडप केली.”


उच्चस्तरीय चौकशीची मागणी

  या सर्व आरोपांबाबत गोटे यांनी मुख्यमंत्री, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्यासह सीबीआय, आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्याकडे पुरावे सादर केल्याचे सांगितले. राज्यपालांनीदेखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे गोटे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

- Advertisement -

जनतेचा परमेश्वरच वाली

  पत्रकार परिषद संपविताना गोटे भावनिक होत म्हणाले,
“भ्रष्ट नेत्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता गेल्याने आज १४ कोटी जनता असहाय झाली आहे. जनतेच्या अडचणींशी या मंत्र्यांचा काहीही संबंध नाही. आता फक्त परमेश्वरच जनतेचा वाली आहे.”


धुळे दर्पण

मुख्य संपादक : सैय्यद सानिल

(B.Com, M.Com, M.A.MCJ)

📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480

📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -