एक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

  धुळे दर्पण न्यूज :- धुळे शहरातील शासकीय दूध डेअरी परिसरात सुरू असलेला बनावट देशी-विदेशी दारू तयार करण्याचा गोरखधंदा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) उध्वस्त केला. निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात स्पिरिट, रसायने आणि बनावट दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा १ लाख ६८ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गणेश नारायण निकम या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow the धुळे दर्पण channel on WhatsApp:

पोलीस अधीक्षकांचा कठोर आदेश

  धुळे जिल्ह्यात येणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह एलसीबीला बनावट दारू व अमली पदार्थाविरोधात मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस पथके नियुक्त करून गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

गुप्त माहितीवरून छापा

  शासकीय दूध डेअरी परिसरात बनावट दारू तयार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक पवार, पोउनि अमित माळी, मच्छिद्र पाटील, हेमंत बोरसे, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, हेकॉ. शिला सुर्यवंशी व हर्षल चौधरी यांनी सहजीवन नगरातील निकम यांच्या घरावर छापा टाकला.


  छाप्यात स्पिरिट, बुच लावण्याचे मशीन, रिकाम्या बाटल्या, बूच, स्टिकर्स तसेच अन्य साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी बनावट दारू तयार होत असल्याचे उघड झाले.


आरोपीविरुद्ध गुन्हा – आणखी तपास सुरू

  निकम याच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापूर्वीही त्याच्यावर गंभीर गुन्हे नोंद असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस आता या दारूचा पुरवठा नेमका कोणाला केला जात होता आणि मागे कोणते मोठे रॅकेट आहे का, याचा तपास सुरू करत आहेत.


धुळेकरांना पोलिसांचा इशारा

  पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बनावट दारूचे सेवन धोकादायक असून नागरिकांनी अशा गोरखधंद्याची माहिती मिळताच त्वरित पोलीस ठाण्यात कळवावी. एलसीबीकडून अशी कारवाई पुढेही सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

"बातम्यासाठी या ग्रुपमध्ये जॉईन व्हा."

धुळे दर्पण
मुख्य संपादक : सैय्यद सानिल
(B.Com, M.Com, M.A. (MCJ))
📞 बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 8087860039 / 8806680480
📩 ईमेल : dhuledarpan@gmail.com

– धुळे दर्पण – 

(आपल्या शहराच्या प्रत्येक घडामोडींचा वार्ताहर)

(आपल्या धुळे शहराची नवी दिशा)

तुमच्या सेवा आणि सुविधांची माहिती देणारे तुमचे विश्वासू माध्यम

- Advertisement -